Pune Grocery Market: दिवाळीनंतर किराणा बाजारातील मागणी मंदावली; साखर, कोलम तांदूळ स्वस्त

साखरेच्या दरात किलोमागे २ रुपयांची घसरण; नवीन हंगामातील तांदळाची आवक वाढल्याने कोलमचे भाव उतरले
Sugar
Sugar Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी संपल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही घरगुती ग्राहकांसह किराणा व्यावसायिकांकडून खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मालाचा उठाव मंदावला आहे. विशेषतः साखर आणि गुळाच्या मागणीत घट झाल्याने मागील पंधरा दिवसांत साखरेच्या भावात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली आहे. तर, नवीन हंगामातील तांदळाची आवक सुरू झाल्याने कोलम तांदूळही किलोमागे दोन ते तीन रुपयांनी स्वस्त झाला आहे. उर्वरित बहुतांश जीवनावश्यक वस्तूंचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Sugar
Pune Fruit Market: पुण्यात बोरांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले; डाळिंब स्वस्त

दिवाळीपूर्वी फराळाचे पदार्थ, मिठाई तसेच घरगुती वापरासाठी साखर, गूळ, खाद्यतेल आणि अन्य किराणा मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. मात्र, सणानंतर ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण घटले आहे. किराणा व्यावसायिकांकडूनही गरजेपुरतीच खरेदी होत असल्याने बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे.

Sugar
Pune Fish Price: पुण्यात चिकनच्या दरात किलोमागे १० रुपयांची घट; मासळी, मटणाचे भाव स्थिर

साखरेच्या मागणीत घट झाल्याने दरात घसरण होऊन प्रतिक्विंटल भाव ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांवर आले आहेत. तर, गुळाचे भाव प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार ५०० रुपयांदरम्यान टिकून आहेत. दरम्यान, तांदळाचा नवीन हंगाम सुरू झाल्याने बाजारात नवीन माल दाखल होऊ लागला आहे. परिणामी, कोलम तांदळाच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांची घट झाली आहे.

Sugar
Sugar Valuation Rate: साखरेचा मालतारण मूल्यांकन दर ४,५०० रुपये प्रतिक्विंटल; साखर कारखान्यांना दिलासा

सध्या एचएमटी कोलम तांदळाला प्रतिक्विंटल ७ हजार ते ७ हजार ४०० रुपये, तर लचकारी कोलमला ८ हजार ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळत आहे. बासमतीसह अन्य तांदळाचे दर स्थिर आहेत. गव्हामध्ये लोकवनला प्रतिक्विंटल ३ हजार ७०० ते ५ हजार रुपये, गावरान ज्वारीला ६ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपये, तर बाजरीला ३ हजार २०० ते ४ हजार २०० रुपये भाव मिळत आहे.

Sugar
Pune Grand Tour Road Work: पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे; ५५ टक्के काम पूर्ण

खाद्यतेल आणि डाळींच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. याखेरीज साबुदाणा, भगर, गोटा खोबरे, शेंगदाणे, रवा, आटा, मैदा, पोहे, लाल मिरची आणि नारळाचे भावही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे बहुतांश वस्तूंच्या दरात बदल झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.