

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात साखर, गूळ, नारळ आणि मिलबर गव्हाला वाढत्या मागणीचा आधार मिळाल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे, तर इतर बहुतांश अन्नधान्य व किराणा मालाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा साडेबावीस लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा अपुरा असल्याने तसेच १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातील सण-उत्सवांमुळे मागणी वाढण्याची शक्यता असल्याने साखरेच्या दरात सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. आठवडाभरात घाऊक बाजारात साखर किलोमागे दीड रुपयाने महागली असून, सध्या तिचा दर ५१ ते ५२ रुपये प्रतिकिलो झाला आहे. साखरेप्रमाणेच गुळालाही चांगली मागणी असल्याने त्याचे भाव तेजीत आहेत. श्रावणात गुळाची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी व्यक्त केला.
याशिवाय, मिलबर गव्हाच्या दरात किलोमागे १ ते १.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाला मागणी वाढल्याने घाऊक बाजारात नारळाच्या दरात नगामागे २ ते ३ रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. व्यापाऱ्यांच्या मते, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मार्केट यार्डातील किराणा बाजारातील उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मिलबर गहू वगळता इतर सर्व प्रकारचे अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, बेसन, रवा, आटा, मैदा, साबूदाणा आणि भगरचे दर स्थिर आहेत.
बाजारभाव पुढीलप्रमाणे:
साखर (प्रतिक्विंटल) ४९००-५००० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) : - शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २४००-३२००, सरकी तेल २२५०-२७५०, सोयाबीन तेल २२००-२६००, पामतेल २२००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५५०, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २२७०-२६०० रु. तांदूळ:- गुजरात उकडा ४३००-४६००, मसुरी ३५००-३७००, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७२००, लचकारी कोलम ७३००-७८००, चिन्नौर ७७००-८२००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू - लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु. ज्वारी :- गावरान नं. १ ५९००-६७००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५२००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी:- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु.
गूळ :- गूळ नं. १ ४९०० ते ५०००, गूळ नं.२ ४७५० ते ४८५०, गूळ नं.३ ४६०० ते ४७००, बॉक्स ४९०० ते ५९०० रु. डाळी:- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७५००-७७००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७४००-७५००, मटकीडाळ ९०००-९२००, उडीदडाळ १००००-१३००० रु. कडधान्ये:-हरभरा ७६००-७८००, हुलगा ६६००-७६००, चवळी ८३००-१०७००, मसूर ७५००-८२००, मूग ९३००-१२४००, मटकी गावरान १५५००-१७५००, मटकी पॉलिश ९०००-९५००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ८५००-८८००, मटकी सेलम १७५००-१८८००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ५०००-५२००, काबुली चणा ८०००-११४०० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.१ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३५०००-४०००० रु. शेंगदाणा :- जाडा ११३००-१२५००, स्पॅनिश–१३५००-१४५००, घुंगरु १२०००-१४००० धने :- गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु. पोहे :- मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००, पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६५०-१७५०, रवा १७००-१८००, मैदा १७००-१८००, बेसन:- (५० किलोस) ४२००-४६५० रु. नारळ :- (शेकडयाचा भाव) : नवा पॅकिंग २३००-२५००, मद्रास ४०००-४२००, पालकोल जुना २५००-२६००, सापसोल ३२००-४८०० रु.