Pune Fish Prices: आषाढात मासळीच्या दरांनी घेतली भरारी; सुरमई, रावस, हलवा महाग, अंडी मात्र स्वस्त

पुण्यात मासळीला जोरदार मागणी; चिकन-मटणाचे दर स्थिर, गावरान व इंग्लिश अंडी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: आषाढ महिन्यामुळे मासळी, चिकन आणि मटणाला एरवीपेक्षा अधिक मागणी आहे. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मागणी मंदावली होती. मात्र, त्यानंतर गुरुवार ते शनिवार विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथून मासळीची आवक होत असली, तरी सर्व प्रकारची मासळी उपलब्ध नसल्याने दर वाढले आहेत. यामध्ये सुरमई, रावस आणि हलवा या मासळीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Fish
Maharashtra Breastfeeding Rate: महाराष्ट्रात नवजात बालकांना पहिल्या तासात स्तनपानाचा विक्रम; प्रमाण पोहोचले ८२ टक्क्यांवर

चिकन आणि मटणाची मागणी वाढली असली, तरी पुरेसा पुरवठा असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. गावरानसह इंग्लिश अंड्यांची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी कमी पडल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत गावरान अंडी शेकड्यामागे ५० रुपयांनी, तर इंग्लिश अंडी शेकड्यामागे १०० रुपयांनी स्वस्त झाली आहेत.

Fish
Pune Ekta Nagar Flood: एकतानगर पुरातून सावरतेय; पाणी ओसरल्यानंतर महापालिकेची स्वच्छता व आरोग्य मोहीम वेगात

रविवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीसह सोमवारी मागणी काहीशी कमी राहण्याची शक्यता असली, तरी आषाढामुळे एकूणच खरेदी कायम आहे. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २) खोल समुद्रातील मासळी १२ ते १५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते ४०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली.

Fish
Pune Illegal School Transport: पुण्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ; पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनांतून शालेय वाहतूक सुरू

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १८००-२२००, मोठे : १७००-१९००, मध्यम : १४००-१६००, लहान : ११००-१३००, भिला : ९००-१०००, हलवा : १०००-१२००, सुरमई १०००-१४००, रावस : ९००-१२००, घोळ : १०००-१२००, करली : ४००-४८०, पाला : (लहान) ९००-१००० मोठे १२००-१४००, वाम : पिवळी १०००-१२००, काळी : ४००-६००, ओले बोंबील : ४००-४८०. कोळंबी : लहान : ३००-३५०, मध्यम : ४००-५५०, मोठी : ६००-७५०, जम्बो प्रॉन्स : १२००-१४००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १९००-२२००, मोरी : ४५०-५५०, राणीमासा : ३५०-४००, खेकडे : ३५०-४००, चिंबोर्‍या : ६५०-७५०.

Fish
Pune Post Office Rakhi Service: रक्षाबंधनासाठी पुणे टपाल विभागाची खास भेट; ‘वनस्टॉप राखी सोल्यूशन’मुळे राखी पोहोचणार देश-विदेशात

खाडीची मासळी:

लेपा : ४००-५००, बांगडा : ३५०-४००, शेवटे : ३००-४००, तिसर्‍या : २८०-३२०, तारली : ३२०-४००. नदीतील मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १८०-२००, मरळ : ३००-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २५०-३००, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ८०-१६०, वाम : ४००-४५०. मटण : बोकडाचे ८००, बोल्हाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११५० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६००, डझन ८४, प्रतिनग ७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news