Pune MLC Election: अर्जमाघारीचा आज शेवटचा दिवस; शरद लाडांची माघार, डॉ. स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा

Legislative Council Election 2026: डमी उमेदवार शरद लाड यांची माघार; प्रताप ऊर्फ भैय्या माने आणि प्रा. सचिन सानप अर्ज मागे घेणार का, याबाबत उत्सुकता
Dr. Smita Yogesh Jadhav
Dr. Smita Yogesh JadhavPudhari News
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार (दि. ९) अंतिम दिवस आहे. पदवीधर मतदारसंघात भाजपचे 'डमी' उमेदवार शरद लाड यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बंडखोर प्रताप ऊर्फ भैय्या माने आणि शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर प्रा. सचिन सानप यांच्यासह अन्य बंडखोर उमेदवारांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पदवीधर मतदारसंघात गुरुवारपर्यंत ६८ उमेदवार रिंगणात होते.

Dr. Smita Yogesh Jadhav
Pune MLC Election 2026: भाजपच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार; डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे यांच्यासाठी नेतेमंडळी मैदानात

शिक्षक मतदारसंघात बंडखोरी कायम

शिक्षक मतदारसंघात गुरुवारपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नव्हता. त्यामुळे ४८ उमेदवार अद्याप रिंगणात आहेत. शिवसेनेचे बंडखोर प्रा. सचिन सानप यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कायम राहणार आहे.

काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे)चे मंगेश चिवटे हे प्रमुख उमेदवार आहेत. माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि प्रा. सचिन सानप यांच्या उमेदवारीमुळे लढतीत चुरस वाढली आहे.

Dr. Smita Yogesh Jadhav
Pune Politics: पुण्यात ‘आंदोलन मैदान’वरून राजकीय ठिणगी! भाजपचा प्रस्ताव असल्याची चर्चा, प्रशांत जगतापांचा वेगळाच दावा

अर्जमाघारीच्या अंतिम दिवशी कोण रिंगणातून बाहेर पडते आणि कोण बंडाचा झेंडा कायम ठेवते, यावर दोन्ही मतदारसंघांतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेषतः भैय्या माने आणि प्रा. सचिन सानप यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१५ हजार मतांचे गणित

शिक्षक मतदारसंघातील मतदारसंख्या आणि बहुकोनी लढत पाहता सुमारे १५ हजार मतांचा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना मिळणारी मते कोणत्या दिशेने जातात, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news