Pune Ganesh Visarjan Parking: शहरात अशी असेल पार्किंग व्यवस्था; 10 ठिकाणी नो-पार्किंग

पार्किंगसाठी आहेत 13 ठिकाणे
Pune Ganesh Visarjan Parking
शहरात अशी असेल पार्किंग व्यवस्था; 10 ठिकाणी नो-पार्किंगPudhari
Published on
Updated on

Pune Ganpati Visarjan parking arrangements

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात नागरिकांना वाहने आणता येणार आहेत; परंतु वाहने मिरवणूक असलेल्या रस्त्यावर नेता येणार नाही. पुणे पोलिसांनी शहराच्या आसपास वाहने पार्क करण्यासाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून, तेथे वाहने पार्क करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पार्किंगसाठी आहेत ही 13 ठिकाणे-

शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी), स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी), संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी), जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी). (Latest Pune News)

Pune Ganesh Visarjan Parking
Pune Ganesh Visarjan 2025: निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी; लाडक्या बाप्पाला आज निरोप...

10 ठिकाणी नो-पार्किंग

लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता येथे नो-पार्किंग आहे. त्या सोबतच खंडोजीबाबा चौक ते वैशाली हॉटेलपर्यंत उपरस्त्यांना जोडणार्‍या दोन्ही बाजूंना 100 मीटर परिसरात पार्किंगला बंदी केली आहे.

Pune Ganesh Visarjan Parking
Pune Rain: गणेश विसर्जनावर पावसाचे सावट; पुण्यात आज हलक्या पावसाचा अंदाज

48 तास जड वाहतुकीला बंदी

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शहरात अवजड वाहनांना तब्बल 48 तास बंदी घालण्यात आली आहे. 6 सप्टेंबर मध्यरात्री 12 ते 7 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहनचालकांनी मध्यवर्ती भागात वाहने आणू नयेत. वाहतूक करू नये. अन्यथा, कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news