Pune PMPML E Bus Charging Stations: पीएमपीचा ग्रीन ट्रान्सपोर्ट प्लॅन; पुणे-पिंपरीत ५ नवीन ई-बस चार्जिंग स्टेशन्स

अप्पर इंदिरानगर, भोसरी, मोशी, वाकड-बालेवाडीत सुविधा; स्वारगेट आणि शेवाळेवाडीत सीएनजी स्टेशनचा विचार
PMPML E Bus Charging Station
PMPML E Bus Charging StationPudhari
Published on
Updated on

पुणे: पीएमपीच्या ताफ्यातील ई-बस व सीएनजी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने पायाभूत सुविधांचा मोठा आराखडा तयार केला आहे. यानुसार अप्पर इंदिरानगर, भोसरी, मोशी, वाकड व बालेवाडी येथे नवीन ५ ई-बस चार्जिंग स्टेशन्स नियोजित केले असून, स्वारगेट आणि शेवाळेवाडी येथे २ नवीन सीएनजी स्टेशन्स उभारण्यास मोठा वाव (स्कोप) आहे. यानुसार सीएनजी स्टेशनसाठी येथे चाचपणी सुरू आहे. या विस्तारामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा वेग वाढणार आहे.

PMPML E Bus Charging Station
Pune Municipal Corporation BJP NCP Dispute: पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी वाद मुख्यमंत्र्यांच्या दारात; टिंगरेंचे थेट साकडे

सध्या पीएमपीच्या ताफ्यासाठी ८ ई-बस डेपो पूर्णतः कार्यान्वित आहेत. यामध्ये भेकराईनगर, भक्ती-शक्ती (निगडी), बाणेर, पुणे स्टेशन, वाघोली, चऱ्होली, मान आणि निगडी ई-बस डेपोचा समावेश आहे. वाढत्या ई-बसच्या चार्जिंगसाठी आगामी काळात ५ नवीन ठिकाणी डेपो उभारणीचे नियोजन वेगाने सुरू आहे. ​दुसऱ्या बाजूला, सीएनजी बसगाड्यांच्या संचालनासाठी न. ता. वाडी (नरवीर तानाजी वाडी), कोथरूड, पिंपरी, हडपसर आणि कात्रज या ५ ठिकाणी सध्या सीएनजी स्टेशन कार्यरत आहेत.

PMPML E Bus Charging Station
Pune Zilla Parishad Global Guruji: ‘ग्लोबल गुरुजी’चा दुसरा टप्पा पूर्ण; १३६ शिक्षकांच्या मुलाखती

भविष्यातील प्रवाशांची गर्दी आणि बसचे वाढते प्रमाण पाहता, स्वारगेट आणि शेवाळेवाडी या मोक्याच्या ठिकाणी नवीन सीएनजी स्टेशन्स सुरू करण्यासाठी पीएमपीकडून चाचपणी केली जात आहे. ​येत्या काळात पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने हजारो नवीन ई-बस व सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यामुळे ही नवी चार्जिंग व इंधन स्टेशन्स बसच्या वेळेवर संचालनासाठी आणि प्रदूषणमुक्त पुण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.

PMPML E Bus Charging Station
Maharashtra College Fee Hike: मॅनेजमेंट-एनआरआय कोट्यात कोट्यवधींची अतिरिक्त वसुली; तरीही महाविद्यालयांना शुल्कवाढ?

पुणेकरांना गतिमान व प्रदूषणरहित वाहतूक सेवा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. अप्पर इंदिरानगर, वाकड, भोसरीसह इतर नियोजित ई-चार्जिंग स्टेशन्स आणि स्वारगेट, शेवाळेवाडी येथील सीएनजी स्टेशनच्या विस्तारामुळे बसच्या फेऱ्यांचे अचूक नियोजन शक्य होईल. भविष्यातील गरज ओळखून या सुविधा वेगाने विकसित केल्या जात आहेत.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

PMPML E Bus Charging Station
Agriculture Department: कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एल्गार

ई-बस चार्जिंग आणि सीएनजी स्टेशनच्या विस्तारामुळे बसफेऱ्यांचे नियोजन अधिक अचूक होईल. भविष्यातील वाहनांच्या संख्येनुसार पायाभूत सुविधा वेगाने विकसित केल्या जात असून, लवकरच नियोजित सर्व चार्जिंग व सीएनजी स्टेशन्स पूर्णक्षमतेने सुरू करण्याचे नियोजन आहे

नागेश गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news