Pune Ganeshotsav DJ: गणेशोत्सव दणक्यात साजरा करा, पण डीजेला थारा नको; प्रशांत जगताप यांचा ठाम विरोध

पुण्याची १२५ वर्षांची परंपरा ढोल-ताशांच्या गजरात जपा; नागरिकांना त्रास होणार नाही अशा मर्यादित ध्वनियंत्रणाला काँग्रेसचा पाठिंबा
Prashant Jagtap
Prashant JagtapPudhari
Published on
Updated on

पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुण्याने महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला दिली आहे. सव्वाशे वर्षांहून अधिक काळाची ही परंपरा जपत पुण्याचा गणेशोत्सव दणक्यात आणि जल्लोषातच साजरा झाला पाहिजे. मात्र, उत्सवाचा पारंपरिक बाज कायम ठेवताना डीजे संस्कृतीला थारा देता कामा नये. नागरिकांना त्रास होणार नाही, अशा मर्यादेत स्पीकरला परवानगी देण्यास हरकत नाही; परंतु डीजेची पाठराखण काँग्रेस करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना मांडली.

Prashant Jagtap
Pune Cyber Fraud: पॅरिसहून येणारा ‘मित्र’ निघाला सायबर भामटा; पुण्यातील तरुणीला २१.८९ लाखांचा गंडा

जगताप म्हणाले, की पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख ही पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशांचा गजर आणि शिस्तबद्ध मिरवणुकांमुळे आहे. या परंपरेला धक्का न लावता उत्सव साजरा झाला पाहिजे. गणेश मंडळांचे मंडप, स्वागत मिरवणूक, विसर्जन मिरवणूक, तसेच वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपरिक मिरवणूक मार्ग यामध्ये अनावश्यक बदल करू नयेत. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम झाला आहे.

Prashant Jagtap
Pune Footpath Crisis: पुण्याच्या ७० टक्के रस्त्यांवर पदपथच नाहीत; वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास

त्यातून सामाजिक भानही हरपत चालले असून, काही चुकीच्या प्रकारांनाही चालना मिळते. त्यामुळे डीजेला आमचा ठाम विरोध राहील. पुण्याच्या गणेशोत्सवाचा जल्लोष आणि भव्यता कमी होणार नाही, तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने पारंपरिक वाद्यांसह मर्यादित ध्वनियंत्रणेला परवानगी देता येऊ शकते. यासाठी राज्य सरकार, प्रशासन, पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन योग्य तो समन्वय साधावा, असेही जगताप यांनी सांगितले.

Prashant Jagtap
Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी तातडीने दूर करा; बार्टीकडून सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू

'डीजेचा उन्माद गणेशोत्सवाला गालबोट लावतोय'

पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र, अलीकडच्या काळात वाढलेला डीजेचा उन्माद या वैभवशाली उत्सवाला बदनाम करीत आहे. कर्णकर्कश आणि अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या श्रवणक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका असून, कानाच्या पडद्याला इजा होण्यासह विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

Prashant Jagtap
Tribal Student Protest: बार्टी पीएच.डी. फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; ‘समान निकष’ जीआरची जाळली होळी

विशेषतः तरुण पिढी सातत्याने अशा प्रचंड आवाजाच्या संपर्कात येत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आहे. उत्सवाचा आनंद आणि जल्लोष जरूर असावा; मात्र तो नागरिकांच्या आरोग्याची किंमत मोजून नको. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुण्याची गणेशोत्सवाची परंपरा जपत डीजेच्या उन्मादाला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा पुण्याची ओळख असलेल्या या सांस्कृतिक उत्सवाला डीजेमुळे गालबोट लागत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news