Maharashtra Private Coaching Centre Act 2026: खासगी शिकवणी केंद्रांच्या मसुद्यावर ११ हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम २०२६’मध्ये कठोर नियमांचा प्रस्ताव; नोंदणी, विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेसह दंडाची तरतूद
Coaching Class
Coaching Class Pudhari
Published on
Updated on

पुणे: ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम २०२६’च्या मसुद्यावर आतापर्यंत तब्बल ११ हजार ४१० हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. पालक, विद्यार्थी, शिक्षक, खासगी शिकवणी चालक, तसेच इतर भागधारकांना आपली मते मांडता यावीत, यासाठी हरकती-सूचना नोंदवण्याची मुदत आता दि. १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

Coaching Class
Maharashtra Electric Vehicle Policy 2025: महाराष्ट्राच्या ई-व्हेईकल उद्योगांना मोठा दिलासा; तालुका वर्गवारीची अट हटवून प्रोत्साहन

राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर प्रभावी नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेल्या मसुद्यात खासगी शिकवणी केंद्रांसाठी कठोर नियम प्रस्तावित आहेत. २५ किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या केंद्रांना नोंदणी अनिवार्य करण्यात येणार आहे. १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Coaching Class
Pune Road Digging Fees: पुण्यात रस्ते खोदाईतून महापालिकेची १०० कोटींची वसुली; तरीही दुरुस्ती निकृष्ट?

शिकवणीचे तास दिवसाला जास्तीत जास्त पाच तासांपुरते मर्यादित ठेवण्याबरोबरच आठवड्यातून किमान एक दिवस सुटी देणे बंधनकारक केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर होणारा अतिरिक्त ताण कमी होईल व त्यांना विश्रांती मिळेल. अध्यापनासाठी पात्रताधारक व्यक्तींचीच नियुक्ती करावी लागणार आहे. मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांना खासगी शिकवणी घेण्यास स्पष्ट मनाई आहे.

Coaching Class
Teacher Training 2026: शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६; ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

इमारतीच्या तळघरात शिकवणी केंद्र चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास १० ते ५० लाख रुपयांपर्यंत दंड, नोंदणी रद्द करणे किंवा केंद्र बंद करण्याची कठोर कारवाई प्रस्तावित आहे. या तरतुदींमुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढेल व व्यावसायिक शोषण रोखता येईल, असा दावा शिक्षण विभागामार्फत करण्यात आला आहे.

Coaching Class
Pune BJP Corporators: पुणे महापालिकेत भाजप नगरसेवकांचा संताप; ‘आम्ही प्रशासनाला प्रोटेक्ट करायला बसलो आहोत का?’

इथे पाठवा हरकती...

मसुद्यावर आणखी सूचना पाठवण्यासाठी doesecondary1 @gmail .com या ई-मेल पत्त्याचा वापर करता येईल. मुदतवाढ दिल्याने शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांकडून आणखी चर्चा व सूचना येण्याची शक्यता आहे. सरकार या सर्व अभिप्रायांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news