Pune Ganesh Darshan: गर्दीला फुटली उकळी! बाप्पांच्या दर्शनासाठी मध्यवर्ती पुण्यातील रस्ते भाविकांनी फुलले

पुण्यात गणपती दर्शनासाठी गुरुवारी रात्री भाविकांची मोठी गर्दी झाली. लक्ष्मी रस्ता, मंडई, शनिवारवाडा परिसरात ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि जिवंत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.
Pune Ganesh Darshan
Pune Ganesh DarshanPudhari
Published on
Updated on

पुणे: ढोल-ताशांचा स्थिर वादन, आकर्षक विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गणरायाच्या जयघोषाने गुरुवारी रात्री मध्यवर्ती पुण्याचा परिसर अक्षरशः गजबजून गेला. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी रात्रीच्या वेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने लक्ष्मी रस्ता, मंडई, शनिवारवाडा परिसरासह प्रमुख मार्गांवर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

दिवसभराच्या कामकाजानंतर कुटुंबासह गणपती दर्शनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या रात्री वाढत गेली. प्रमुख मंडळांच्या परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंडळांच्या आकर्षक सजावटी, विद्युत रोषणाई आणि जिवंत देखावे पाहण्यासाठीही भाविकांची उत्सुकता दिसून आली. त्यामुळे दर्शनासोबतच गणेशोत्सवाचा देखणा माहोल अनुभवण्यासाठी नागरिकांची पावले मध्यवर्ती भागाकडे वळत होती.

Pune Ganesh Darshan
Pimpri Motorized Number Plate: बटण दाबलं की नंबर प्लेटच गायब! पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर ‘मोटराइज्ड’ प्लेटचे नवे आव्हान

भाविकांची वाढती संख्या आणि वाहनांची वर्दळ यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले. अनेक नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे मंडई मेट्रोस्थानकासह मार्गावरील स्थानकांवरही भाविकांची वर्दळ वाढली होती. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर नागरिकांचे समूह प्रमुख गणेश मंडळांच्या दिशेने पायी जाताना दिसत होते.

रस्त्यांवर भाविकांची गर्दी, ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, खाद्यपदार्थांच्या स्टॉलभोवतीची लगबग आणि गणेश मंडळांकडून करण्यात आलेली रोषणाई यामुळे मध्यवर्ती पुणे रात्री उशिरापर्यंत उत्साहाने फुलून गेले होते.गर्दीचा त्रास होत असतानाही बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह मात्र कायम असल्याचे चित्र होते.

Pune Ganesh Darshan
Bhosari Open Bar Action: भोसरीतील ‘ओपन बार’ला पोलिसांचा दणका! पीएमटी चौकातील १८ टपऱ्या हटविल्या; १७९ गुन्हे दाखल

कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठीही भाविकांची वर्दळ होती. मंडई, लक्ष्मी रस्ता, बुधवार पेठ आणि आसपासच्या रस्त्यांवर भाविकांचे समूह दिसत होते. देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी थांबणाऱ्या नागरिकांमुळे परिसरातील गर्दीत आणखी भर पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news