Pune PMC Development Works: पुणे गाडीखाना दवाखान्यासाठी 97.96 लाखांच्या कामांना मंजुरी

कसबा मतदारसंघातील दवाखान्यात विकासकामे; नागरिकांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार
Hospital
HospitalPudhari
Published on
Updated on

पुणे: कसबा मतदारसंघातील गाडीखाना दवाखान्यात विविध विकासकामे करण्यासाठी सुमारे 97.96 लाख रुपयांच्या निविदेला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Hospital
Pune Municipal Project Approval: पुणे महापालिकेत 2000 कोटींच्या प्रकल्पांवरून वादंग

याबाबतची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. या कामाचा प्रस्ताव महापालिकेच्या भवन विभागामार्फत सादर करण्यात आला होता. संबंधित कामासाठी सर्वांत कमी दर देणाऱ्या ठेकेदाराची निवड करण्यात आली असून, त्यांच्या निविदेनुसार 2 टक्के कमी दरात काम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता.

Hospital
Pune Electricity Rate Cut: पुणेकरांना वीजदरात दिलासा; सरासरी 30 पैशांनी दर कमी

या प्रकल्पाच्या एकूण खर्चात जीएसटी, रॉयल्टी, तसेच मटेरिअल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, अंतिम खर्च सुमारे 97.96 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामासाठी सुमारे 95.20 लाख रुपयांचीच तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध निधीनुसार टप्प्या-टप्प्याने काम पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Hospital
Pune Ring Road Development: पुणे रिंग रोडवर हेलिपॅडची उभारणी; आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळणार

दरम्यान, या कामासाठी डिपॉझिट फंडाचा वापर न करता महापालिकेच्या नियमित अर्थसंकल्पीय तरतुदीतूनच खर्च भागविण्यात येणार आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदारासोबत करारनामा करून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Hospital
Maharashtra Land Measurement Fee: शेतकऱ्यांना दिलासा; जमीन मोजणी फी फक्त 200 रुपये

शहरातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने गाडीखाना दवाखान्यातील ही विकासकामे महत्त्वाची ठरणार आहेत. या कामांमुळे दवाखान्याची पायाभूत सुविधा सुधारून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news