Pune Fraud Case : बनावट कागदपत्रांद्वारे कंपनीला 24 लाखांना गंडा

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांचा वापर करत कंपनीची 24 लाख 65 हजार 865 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, कंपनीचा एजंट असलेल्या अमोल अशोक माळी (रा. धायरी) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, अकबर दावल व्हनवाड (वय 38, रा. शेवाळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. अकबर व्हनवाड यांची इन्क्रेड फायनान्स सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे.

अमोल माळी हा अकबर व्हनवाड यांच्या कंपनीत एजंट म्हणून नोकरीस आहे. आरोपी अशोक माळी याने कंपनीचे बनावट दस्तऐवज वापरून अकबर व्हनवाड यांची आणि त्यांच्या ग्राहकांची 24 लाख 65 हजार 865 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

पादचार्‍याला लुटणारी टोळी जेरबंद

रस्त्याने पायी चाललेल्या एकाला अडवून तीन हजारांची रोकड आणि मोबाइल असा आठ हजारांचा ऐवज चोरणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक उर्फ नयन हरिदास भोसले (वय 21 रा. शेवाळवाडी,) प्रथमेश इंदवे (वय 20 रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news