

Pune flood alert today
पुणे: खडकवासला आणि वरसगाव धरणातून रविवारी रात्री 7 नंतर एकूण 28 हजार 900 पेक्षा जास्त वेगाने नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने शहरातील नदीपात्र दुधडी भरून वाहून पाणी रस्त्यावर आले आहे. भिडेपूल रविवारी दुपारीच पाण्याखाली गेला आहे. मोठ्या विसर्गाने नदीपात्र फुगले असून आज शहराला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरासह चारही धरण क्षेत्रात गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे रविवारी 91 टक्के भरल्याने जलसंपदा विभागाने मोठ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा निर्णय रविवारी रात्री घेतला. (Latest Pune News)
खडकवासलातून सुमारे 18 हजार 300 तर वरसगाव धरणातून सुमारे 9 हजार 500 क्यूसेक असा एकूण सुमारे 28 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग शहरातील नदीपात्रात येण्यास सुरुवात झाली आहे तसेच रविवारी रात्री 12 पासून शहरासह धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरु झाला तो सकाळी 5 पर्यँत थांबलेला नाही त्यामुळे आज पुणे शहरात पूरस्थितीची शक्यता असून जलसंपदा विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
सूर्यदर्शन नाही,गारठा वाढला..
रविवारी दिवसभर शहरात पावसाची रिपीट सुरू होती त्यामुळे संपूर्ण शहर पोलीस झाले गारठा कमालीचा वाढला आहे.
भिडेपूल पूल प्रथमच पाण्याखाली..
यंदा भिडेपूल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाण्याखाली गेला आहे.दरवर्षी तो जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याखाली जातो मात्र यंदा हा नजरा शहरवासीयांना खूप उशिरा बघावयास मिळाला.
नदीपत्रावर पोलीस बंदोबस्ताची गरज..
रविवारी दुपारी नदीपात्र ओसंडून वाहिल्याने पाणी रस्त्यावर आले तरीही गुडघाभर पाण्यातून नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवत होती. आजही यापेक्षा भीषण परिस्थिती राहणार आहे त्यामुळे नदीपात्रवर पोलीस बंदोबस्ताची गरज आहे.नागरिकांनी या ठिकाणी वाहने आणू नयेत तसेच नदीपात्र परिसरात गर्दी करू नये असा इशारा जलसंपदा विभागाने रविवारी रात्री दिला.
चारही धरणाचा आज सकाळी 6 वाजताचा अपडेट..
खडकवासला: १८ हजार ४८३ क्यूसेक ने विसर्ग सुरू
पानशेत: ६३४.७५क्यूसेक ने विसर्ग
वारसगाव: एकूण 9 हजार क्यूसेक ने विसर्ग
टेमघर: ७०३.९०
चारही धरणात आवक: २६.६३ टीएमसी
एकूण चारही धरणे ९१.३५% भरली
गेल्या वर्षीची जुलै मधील स्थिती:
२४.५५ टीएमसी आवक ८४.२२% धरणे भरली होती.
-यंदा 7%जास्त पाणी जास्त साठले.
सोमवारी सकाळी 7 वाजताचे अपडेट...
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 18 हजार 483 क्युसेक्स चा ओघ वाढवुन सकाळी 8 वा 2 हजार 21 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेटचे उपविभागीयअभियंता मोहन भदाणे यांनी दिली आहे.