पुणे : मागणी चांगली असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम

पुणे : मागणी चांगली असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या पूर्व किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी बंद झाल्याने बाजारात मासळीची आवक रोडावली आहे. सध्यस्थितीत पश्चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाला मागणीही चांगली असल्याने मासळीचे तेजीतील दर कायम आहे. उन्हाळ्यामुळे पक्ष्यांची वाढ मंदावत असल्याने बाजारात पक्ष्यांची आवक घटून चिकनचे वाढलेले भाव टिकून आहेत.

मागणी वाढल्याने गत आठवड्याच्या तुलनेत इंग्लिश अंडीच्या भावातही शेकड्यामागे चाळीस रुपयांनी वाढ झाली. गावरान अंडी व मटणाचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 30) खोल समुद्रातील मासळीची 7 ते 10 टन, खाडी 200 ते 400 किलो, तर नदीच्या मासळीची 500 ते 600 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1500-1600, मध्यम : 1300-1400, लहान : 1000-1100, भिला : 700-800, हलवा : 700-800, सुरमई : 800-900, रावस : 700-800, घोळ : 600-700, करली : 360-400, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 360-400, पाला : 1000-1200, वाम : काळी 360-400 पिवळी 700-800, ओले बोंबील : 200-280.

कोळंबी : लहान 200-280, मोठी : 360-600, जंबोप्रॉन्स : 1400-1500, किंगप्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 360-400, मांदेली : 120-140, राणीमासा : 240-280, खेकडे : 240-300, चिंबोर्या : 550-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 280-300, खापी : 240-300, नगली : 400-440, तांबोशी : 400-480, पालू : 280-320, लेपा : 200-240, बांगडा : लहान 90-100 मोठा 120-140, शेवटे : 240-280, पेडवी : 100-120, बेळुंजी : 140-160, खुबे : 120-140, तिसर्‍या : 200-240 तारली : 120-140.

नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 240-280, खवली : 300-320, आम्ळी : 140-160, खेकडे : 400 480वाम : 550. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 220, लेगपीस : 270, जिवंत कोंबडी : 150, बोनलेस : 320. अंडी : गावरान (शेकडा) 850, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 475, डझन 66, प्रतिनग 5.5.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news