बापच बनला पोटच्या मुलाचा कर्दनकाळ! ३ वर्षीय चिमुकल्याची बापाने केली निर्घृण हत्या

Pune Crime : हत्येनंतर मृतदेह जंगलात फेकला
 Pune Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग आनावर झाल्याने बापाने रागाच्या भारात आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हत्येनंतर त्याने मुलाचा मृतदेह जंगलात फेकून दिला. हिम्मत माधव टीकेटी असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधव टीकेटी याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आयटी इंजिनियर माधव टीकेटी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. दरम्यान त्यांच्यात झालेल्या जोरदार भांडणाचा राग मनात धरून त्याने आपल्या पोटच्या मुलाचा खून केला. व त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे त्याने मुलाचा खून केल्यानंतर पोलिसांत धाव घेत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू होता. यादरम्यान माधव टीकेटी आणि त्याच्या पत्नीचे नेहमी वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता पत्नीशी वारंवार होत असल्याच्या भांडणाच्या रागातून आपणच मुलाचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news