पुणे : बेल्हा-जेजुरी राज्य मार्गावर भीषण अपघात; माय लेकासह तीन ठार

पुणे : बेल्हा-जेजुरी राज्य मार्गावर भीषण अपघात; माय लेकासह तीन ठार

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा : बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर धामारी (ता. शिरूर) येथील रस्त्यावर आयशर टेम्पोची व दुचाकीची धडक होऊन खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील तीन जणांचा मृत्यू झाला. विजया दिलीप डोके, संकेत दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. शुक्रवारी (दि. ३) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबतची माहिती अशी की, संकेत डोके हा आपली आई विजया डोके यांना शिक्रापूरला सोडवण्यासाठी दुचाकीने निघाला होता. यासाठी त्यांनी आपला मित्र ओंकार सुक्रे याला सोबतीला घेतले होते. परंतु, धामारीच्या गंगासागर नजीक एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हे अपघात झाला. या अपघातामध्ये या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news