

जळोची: मुंबई व ठाण्यातून पुण्याला जाणार्या येणार्या एसटीच्या एकूण 100 इलेक्ट्रिक बस सुरू आहेत. त्यातील काही बसना प्रतिफेरी प्रतिबस 1880, तर काही बसना 2045 रुपये इतका टोल भरावा लागतो. त्यामुळे एसटीला पुणे मार्गावर महिन्याला एकूण अंदाजे 70 लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली असली, तरी त्याचे परिपत्रक सरकार कधी काढणार? असा सवाल एसटी कर्मचार्यांनी केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या परळ आगारात दादर-पुणे मार्गावर धावणार्या एकूण 26 इलेक्ट्रिक बसेस आहेत. एका बसच्या दिवसभरात 3 फेर्या होतात. त्यानुसार 27 बसच्या 81 फेर्या होतात. त्याचप्रमाणे स्वारगेट आगाराच्या एकूण 33 बस आहेत. एका इलेक्ट्रिक बसच्या दिवसभरात 3 फेर्या होतात. (Latest Pune News)
त्यानुसार 33 बसच्या प्रतिदिन एकूण 99 फेर्या होतात. ठाणे आगारात एकूण 15 बस असून एका बसच्या दिवसभरात 3 फेर्या होतात. त्यानुसार 15 बसच्या 45 फेर्या होतात. बोरिवली स्थानकात 8 बस आहेत. एका बसच्या दिवसभरात 3 फेर्या होतात.
8 बसेसच्या 24 फेर्या होतात. पुणे स्टेशन येथे 17 बस आहेत. एका बसच्या दिवसभरात 3 यानुसार एकून 51 फेर्या होतात. याशिवाय अटलसेतू मार्गे बस गेल्यास स्वारगेट येथे जाण्यासाठी 3125 व चिंचवड येथे जाण्यासाठी 3290 रुपये इतका टोल भरावा लागतो.
विजेवरील गाड्यांना टोलमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एसटीच्या दृष्टीने तो फायदेशीर ठरू शकतो, पण सरकारने या संदर्भातील परिपत्रक अद्याप काढलेले नाही. ते काढल्यास टोलच्या जोखडातून एसटी मुक्त होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील परिपत्रक तातडीने काढण्याची मागणी एसटी कर्मचार्यांनी केली आहे.