

पुणे: पुणे जिल्ह्यात तब्बल हजारांहून अधिक दुबार व नोंदणी असलेले मतदार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे. मात्र, या मतदारांची यादी तालुकानिहाय न देता तब्बल हजार पानांची मतदान केंद्रनिहाय डिजिटल यादी पाठविण्यात आल्याने प्रत्यक्ष दुबार मतदार शोधण्याचे काम प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. केवळ आठ दिवसांच्या कालावधीत या सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जुलै मतदार यादी ग््रााह्य धरली आहे. या यादीचे गटनिहाय विभाजन करताना पुणे जिल्ह्यात हजार मतदारांची नावे दुबार अथवा असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यानंतर आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला मतदान केंद्रनिहाय तयार केलेली हजार पानांची डिजिटल मतदार यादी पाठविण्यात आली.
आयोगाच्या सूचनांनुसार दुबार नोंदणी असलेले मतदार मतदान अधिकारी यांच्या माध्यमातून आहेत. संबंधित नोंदी एकाच असल्याची खात्री करून त्या तो नेमक्या कोणत्या गटातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत लेखी अर्ज भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मतदाराची एक नोंद कायम ठेवून इतर नोंदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र, आयोगाकडून तालुकानिहाय स्वतंत्र यादी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
मतदान केंद्रनिहाय आलेल्या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांतील दुबार व मतदारांची तालुकानिहाय यादी पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनावर आले आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असून, प्रशासनाचा मोठा वेळ खर्च होत आहे.
सध्या ही यादी तयार करून ती संबंधित तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात येत असून, त्यानंतर माध्यमातून प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या दुबार मतदारांची पडताळणी कमी वेळेत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.