Pune Drugs Case : ससूनमधील डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन

Pune Drugs Case : ससूनमधील डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर केला आहे. शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.
चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे दिसून आले.

त्यामुळे घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात निर्णय घेतला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज संबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समितीने चौकशी करून अहवाल आयुक्तामार्फत शासनास 31 ऑक्टोबर रोजी सादर केल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने कळविले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news