Pune Drugs Case | पबमध्ये पहाटेपर्यंत धांगडधिंगा

पुण्यात पब्समध्ये उघडपणे ड्रग्सचे सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत
Videos of taking drugs in L3 pub go viral
L3 पब मध्ये ड्रग्स सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल File Photo

पुणे : हडपसर महंमदवाडी येथील ‘द कल्ट’ पबमध्ये पार्टी केल्यानंतर हा ग्रुप फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल-थ्री ’ पबमध्ये आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस उपायुक्त (परिमंडल 1) संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, पार्टीला उपस्थित असलेल्या 40 व्यक्ती हडपसर महंमदवाडी येथील ‘द कल्ट’ पबमधून ‘एल 3’ पबमध्ये गेल्या होत्या. त्यांच्यासाठी अक्षय कामठेने व्यवस्था केली होती. त्यांना प्रवेश नियमाप्रमाणे देण्यात आला नाही.

Videos of taking drugs in L3 pub go viral
Pune Drugs Case | तरुणींकडून ड्रगसेवन; पुण्यात 'व्हायरल व्हिडीयो'ने उडवली खळबळ

अमली पदार्थ सापडले नाहीत

काही जणांकडून रोख, काही जणांकडून गुगल पे अशा प्रकारे पैसे घेण्यात आले. आतमध्ये खाण्याचे आणि मद्याचे पैसे वेगळे घेण्यात आले. हे सर्व तपासामध्ये उघड होईल. आम्ही पार्टीला आलेल्या व्यक्ती ज्या पबमधून येथे आल्या, त्या पबचीही चौकशी करणार आहोत. सध्या आम्ही ’एल 3’ पबमधील काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामध्ये अमली पदार्थ सापडले नाहीत. यामुळे महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पार्टीमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे.

व्हिडिओ व्हायरलनंतर पोलिस जागे

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेकडून कल्याणीनगरसह शहरातील विविध भागांतील पबवर कारवाई केली जात आहे. असे असतानाही फर्ग्युसन रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकाजवळ ‘एल थ्री - लिक्विड लीजर लाउंज’ हा पब रविवारी पहाटे पाचपर्यंत सुरू होता. तेथे तरुण-तरुणी मद्यपान करीत होते. या पबमधील पार्टीच्या वेळी काही तरुण स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ‘एल थ्री -लिक्विड लीजर लाउंज’ पब बारमध्ये रविवारी (ता. 23) पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीत धांगडधिंगा सुरू होता. तसेच, या पबमध्ये काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हिडीओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news