Pune Drugs Case | तरुणींकडून ड्रगसेवन; पुण्यात 'व्हायरल व्हिडीयो'ने उडवली खळबळ

व्हायरल व्हिडीओ विमाननगर येथील एका मॉलच्या शौचालयातील असल्याचा समाज माध्यमांवर दावा
Two young women consuming drugs in the toilet
शौचालयात ड्रग्स घेताना दोन तरुणी File Photo

पुणे : निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ पब सुरू ठेवल्याने व शिवाजीनगर येथील ‘एल-थ्री’ पबमध्ये ड्रगसेवन केले जात असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका मॉलमधील शौचालयात दोन मुली ड्रग सेवन करीत असल्याचा व्हिडीओ माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Summary
  • फर्ग्यूसन रस्त्यावरील L3 पब येथे पहाटे पर्यन्त पार्टीत ड्रग्सचे सेवन होत होते

  • त्या घटनेनंर एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुली ड्रग्स चाटत असल्याचे दिसून आले

  • पुणे पोलिस संथ का बसले आहेत, हा प्रश्न इथे निर्माण होतो

पोलिस संथ का बसले आहेत?

व्हायरल झालेला व्हिडीओ एका मॉलमधील असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात आला आहे. सलग दुसर्‍या दिवशी दुसर्‍या ठिकाणचा ड्रगसेवनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस तसेच उत्पादन शुल्क विभागाचे नेमके काय सुरू आहे? असा सवाल समाज माध्यमांत उपस्थित होऊ लागला आहे. या व्हिडीओबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Two young women consuming drugs in the toilet
Pune Drugs Case | एल-3 पबला ठोकले टाळे

पुण्यात ड्रग्सचे प्रमाण अटकेपार

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लीझर लाउंज (एल-3) पबमध्ये पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा प्रकार एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला होता. हडपसर येथील एका बारमधील पार्टी संपवून रात्री दोन वाजता पुन्हा हा पब उघडण्यात आला. पहाटेपर्यंत हा पब सुरू होता. त्या पार्टीत एका बाथरूममध्ये काही मुले ड्रग्ज सेवन करीत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये आढळून आले होते.

'पब्स'ना आधार कुणाचा? कानाडोळा का?

या प्रकारानंतर आता विमाननगर येथील एका मॉलमधील एका शौचालयात दोन तरुणी मोबाईलवर अमली पदार्थसदृश पांढरी पावडर घेऊन ती चाटत असल्याचे आढळून आले आहे. या वेळी एका महिलेला तरुणींच्या कृत्याबाबत समजल्यानंतर त्या महिलेने तरुणींना हटकले, तरीही त्या मुली ड्रग्ज सेवन करण्यात मग्न असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ त्याच महिलेने रेकॉर्ड केला असून, महिलेचा व्हिडीओ नीट न येण्यासाठी तरुणींनी मोबाईलला हात आडवा केल्याचाही प्रकार व्हिडीओत दिसून येत आहे. गडबडीत ड्रगसेवन केल्यानंतर मुली लगबगीने बाहेर पडल्या. यामुळे पुन्हा एकदा पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news