Pune Drugs Case | एल-3 पबला ठोकले टाळे

दोन बिट मार्शलचे निलंबन, चार जण ताब्यात
Drugs were consumed till late at night L3 pub
L3 पब, येथे रात्री उशिरापर्यंत ड्रग्सचे सेवन चालत असेFile Photo
Published on
Updated on


पुणे : पुढारी वृत्तसेवा : 
विहित वेळेत पब बंद केल्याचे दाखवून नंतर पुन्हा दीडनंतर रात्री उशिरा पार्टी आयोजित करणार्‍या फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल 3) पबला पुणे पोलिसांनी उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थित टाळे ठोकल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन बिट मार्शलचे निलंबन करण्यात आले आहे.

Summary
  • ड्रग पार्टीचा व्हिडीओ व्हायरल

  • पब बंद केल्याचे दाखवून पुन्हा पार्टीचे केले होते आयोजन

  • पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: पोलिस उपायुक्त गिल यांची माहिती

Drugs were consumed till late at night L3 pub
Pune Drugs Case | मंत्रीच अधिकार्‍यांना पाठीशी घालतात: रवींद्र धंगेकर

युवकांमध्ये अमली पदार्थांची क्रेझ

पबमध्ये पार्टीत काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून रविवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. त्यानंतर ही कारवाई करीत पबला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी पबचे चालक रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, व्यवस्थापक मानस मलिक या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अक्षय कामठे याला चौकशीसाठी पाचारण केले आहे.

गिल म्हणाले, एल 3 पबचे मालक संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे हे आहेत. हा बार त्यांनी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. या तिघांनी जून महिन्यापासून हा पब सुरू केला होता. रविवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्यांनी हा पब चालविला. यादरम्यान पार्टी आयोजित करण्याबाबतचा फोन आला. त्यांनी 40 ते 50 लोकांना घेऊन पार्टी करायची, असे सांगितले. पबचालकांकडून त्यास होकार देण्यात आला. त्यानंतर पार्टीबाबत गुप्तता बाळगून मुख्य दरवाजातील प्रवेश बंद करण्यात आला आणि मागील दरवाजातून प्रवेश दिला, अशी माहिती गिल यांनी दिली.

गिल म्हणाले, मॅनेजर मानस मलिक, पार्टी इव्हेंट आयोजक अक्षय दत्तात्रय कामठे यांनी मिळून ही पार्टी आयोजित केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर तत्काळ पुणे पोलिसांनी एल 3 मध्ये जाऊन तपासणी केली असता डीव्हीआर ताब्यात घेतला. त्यातून त्यांची पार्टी सुरू असल्याला दुजोरा मिळाला आहे. पबला उत्पादन शुल्कच्या उपस्थितीत टाळे ठोकण्यात आले. या प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

कारवाईनंतर पबला टाळे ठोकण्यात आले

रविवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. त्यानंतर ही कारवाई करीत पबला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी पबचे चालक रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, व्यवस्थापक मानस मलिक या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अक्षय कामठे याला चौकशीसाठी पाचारण केले आहे. गिल म्हणाले, एल 3 पबचे मालक संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे हे आहेत.

हा बार त्यांनी रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. या तिघांनी जून महिन्यापासून हा पब सुरू केला होता. रविवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत त्यांनी हा पब चालविला. यादरम्यान पार्टी आयोजित करण्याबाबतचा फोन आला. त्यांनी 40 ते 50 लोकांना घेऊन पार्टी करायची, असे सांगितले. पबचालकांकडून त्यास होकार देण्यात आला. त्यानंतर पार्टीबाबत गुप्तता बाळगून मुख्य दरवाजातील प्रवेश बंद करण्यात आला आणि मागील दरवाजातून प्रवेश दिला, अशी माहिती गिल यांनी दिली.

कागदपत्रांचा तपास सुरू

तरुणांचा व्हिडीओ दिसत आहे, ते ड्रग असू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगानेही आमचा तपास सुरू आहे. याप्रकरणीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पब कम बार असलेल्या एल 3 ला परवानगी कशी मिळाली, याबाबतची कागदपत्रे आम्ही तपासात ताब्यात घेत आहोत. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्याचे काम सुरू होते.

पुणे पोलिसांवर टीकेची झोड

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर दिवसभर टीकेची झोड उठली होती. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ड्रग्जपुरवठा करणारे पेडलर्स आणि ड्रग्जच्या गुन्ह्यातील संबंधितांना पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांना यापुढे गुन्ह्यात कोणत्याही पद्धतीने सहभाग आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला होता. तरीही पुण्यातील पबमध्ये ड्रग्ज कसे उपलब्ध होत आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सूचना देऊनही पालन नाही

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री साडेबारापर्यंत पब सुरू ठेवावेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पबचालकांना देण्यात आल्या होत्या. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार : मुख्यमंत्री

या प्रकरणाच्या तपासाचे आदेश पोलिसांना दिले असून संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे. पोलिस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र ड्रग्जमुक्त झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news