Pune Drugs Case | अनधिकृत पबवर भाजपही आक्रमक

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
BJP Pune City President Dhiraj Ghate
भाजप पुणे शहर अध्यक्ष धीराज घाटे Pudhari
Published on
Updated on

पुणे : शहरातील अनधिकृत पबच्या विरोधात विरोधकांसह आता सत्ताधारी भाजपही आक्रमक झाली आहे. शहरातील सर्व पब बंद न केल्यास व पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.

BJP Pune City President Dhiraj Ghate
Pune Drugs Case | पबमधील ड्रग पार्टी; आठ जणांना अटक

पोर्शे कार प्रकरण आणि नंतर..

महिनाभरापूर्वी कल्याणीनगर येथील पबमधून निघालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांचा बळी घेतल्यानंतर शहरातील पब संस्कृतीच्या आड सुरू असलेला गोरखधंदा चव्हाट्यावर आला. यामुळे शासनाची नाचक्की झालीच. यातून मोठ्याप्रमाणावर कारवाई सुरू झाली. यानंतरही रविवारी फग्युर्सन रस्त्यावर एका पबमध्ये रात्री उशिरापर्यंत दारूविक्री आणि पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये अमली पदार्थांचेही सेवन सुरू असल्याचे उघड झाले. यामुळे पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा आणि पबचालकांचे साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवरून पुन्हा सत्ताधारी विरोधकांच्या रडारवर आले आहेत. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत एका पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी निलंबित केले.

पुण्यातले पब्स हद्दपार करा : भाजप

या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिका, पोलिस, पीएमआरडीए, उत्पादन शुल्कचे आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविली आहे. त्यामध्ये पुण्यात सुरू असलेले सर्व पब हद्दपार करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच शहर आणि जिल्ह्यातील अधिकृत पबची यादी प्रसिद्ध करावी, गणेशोत्सवाप्रमाणेच रात्री दहानंतर पबमधील स्पीकर बंद करावेत, पब व अन्य अवैध धंद्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी, त्यावर येणार्‍या तक्रारींची दखल घ्यावी, शहरातील अमली पदार्थ व्यापार थांबविण्यासाठी पोलिसांनी काय प्रयत्न केले, याची माहिती द्यावी, रात्रीच्या वेळी वेगाने गाड्या चालविणारे आणि अश्लील चाळे, आरडाओरडा करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी घाटे यांनी केली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे, त्या संदर्भात लवकरच पर्दाफाश केला जाईल, असे स्पष्ट करत राज्य शासनालाच आव्हान दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news