

पुणे : पुणे विभागाची विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरुवारी (दि.18) रोजी पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये यशस्वीरीत्या पार पडली. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांनी या बैठकीचे समन्वय साधले. समिती सदस्यांनी यावेळी प्रवाशांच्या सुविधा, पायाभूत सुविधा विकास आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रांशी संबंधित इतर रेल्वेशी संबंधित बाबींवर सूचना केल्या. बैठकीत एकूण 12 सदस्यांनी भाग घेतला होता.
यात शिवनाथ बियाणी, नंदकुमार पाटील, राहुल मुथा, ऋतुराज काळे, अधिवक्ता विनीत पाटील, राम जोगदंड, राजकुमार नहार, सुनील गुप्ता, डॉ. गोरख बारहाते, रफिक लतीफ खान, दिलीप कारखानीस आणि दिलीप बटवाल उपस्थित होते. पुणे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांनी आभार मानले.