Women Postal Workers Pune: हातात टपालाची बॅग, खांद्यावर संसाराची जबाबदारी! पुणे जिल्ह्यात १,११५ महिला टपालसेवेत

घर-संसार, मुलांची जबाबदारी आणि शेतीची कामे सांभाळत महिलांची टपालसेवा; ग्रामीण डाकसेवेकडेही वाढता कल
Women Postal Workers Pune
Women Postal Workers PunePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: हातात टपालाची बॅग... सकाळपासून गावागावांत फिरत नागरिकांच्या दारापर्यंत पोहचणारी पत्रे, कागदपत्रे आणि विविध सेवा... आणि दुसरीकडे घरातील संसार, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे, या सगळ्याचा मेळ साधत पुणे जिल्ह्यात सुमारे १ हजार ११५ महिला टपालसेवेत कार्यरत आहेत.

टपाल विभागातील नोकरी आता केवळ शहरातील महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ग्रामीण भागातील मुली आणि महिलाही या सेवेकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण डाकसेवक म्हणून काम करण्याची संधी ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचा एक नवा पर्याय मिळाला आहे.

ग्रामीण डाकसेवक या पदासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळत असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी टपाल विभाग हा शिक्षणानंतर रोजगाराचा मार्ग ठरत आहे.

Women Postal Workers Pune
Pune MLC Election 2026: भाजपच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार; डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे यांच्यासाठी नेतेमंडळी मैदानात

उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे शक्य नसलेल्या किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबलेल्या मुलींना आपल्या गावाजवळच काम करण्याची संधी मिळते. यामुळे दहावीपर्यंत शिक्षण, त्यानंतर नोकरी आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे, असा प्रवास अनेक ग्रामीण मुली आणि महिलांना शक्य होत आहे.

मुलांची जबाबदारी, शेती कामे अन्‌ नोकरी

ग्रामीण भागातील महिला कर्मचार्‍यांसाठी या नोकरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामाची सांगड त्या आपल्या कौटुंबिक जबाबदार्‍यांशी घालत आहेत. घरातील स्वयंपाक, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे आणि कुटुंबाची देखभाल करीत असतानाच टपालसेवेतही त्या आपली भूमिका बजावत आहेत.

Women Postal Workers Pune
Pune Protest Ground: पुण्यात आंदोलनासाठी स्वतंत्र ‘आंदोलन मैदान’; सभागृह नेते बिडकरांनी स्थायी समितीपुढे ठेवला प्रस्ताव

विभागीय सेवेतही महिला पुढे

ग्रामीण डाकसेवकांबरोबरच विभागीय टपालसेवेतही महिलांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहर पश्चिम विभागात २३१, पुणे शहर पूर्व विभागात २२२, बारामतीत ३४ आणि पुणे रिजन कार्यालयात १७ महिला कार्यरत आहेत. म्हणजेच, ग्रामीण भागातील पोस्टमनपासून शहरातील विभागीय कार्यालयांपर्यंत टपाल विभागाच्या विविध स्तरांवर महिलांची उपस्थिती ठळक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news