Parkinson Disability Policy India: दिव्यांग धोरणात पार्किन्सनचा समावेश; विशेष योजनांची मागणी

रक्ताशी संबंधित आजारांसाठी स्वतंत्र सुविधा देण्याची गरज; कार्यकर्त्यांचा आग्रह
Disability
DisabilityPudhari
Published on
Updated on

पुणे: दिव्यांग व्यक्तींना सामान्य व्यक्तींप्रमाणे सुसह्य जीवन जगण्यासाठी राज्य शासनाने दिव्यांग धोरण अंमलात आणले आहे. दिव्यांगत्वाच्या एकूण 21 प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पार्किन्सन आजाराचा एक दिव्यांगत्व प्रकार म्हणून समावेश केला आहे.

Disability
Pune Pashan Lake Fish Death: पाषाण तलावातील मासे मृत्यू प्रकरणी 4 अधिकाऱ्यांना निलंबन; मनपाची कडक कारवाई

तथापि नव्याने समाविष्ट दिव्यांगत्वाच्या प्रवर्गाच्या अनुषंगाने विशेषतः रक्ताशी संबंधित आजार असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र योजना व कार्यक्रम आखणे आवश्यक असल्याचे मत दिव्यांग संघटनांकडून व्यक्त होत आहे.

Disability
Pune Metro Swargate Katraj Underground Corridor: पुणे मेट्रोचा स्वारगेट–कात्रज भूमिगत मार्गाचे काम सुरू

दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार विशेष गरजा लक्षात घेऊन योजनांची निर्मिती केली जात नाही. तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांना देखील उपचार तसेच सहाय्यक साधनांची गरज असते. त्यामुळे किमान उपचारात्मक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हरिदास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Disability
Pune Police Extortion: पुण्यात पोलिसांचा खंडणी घोटाळा उघड; बडतर्फीची कारवाई निश्चित

काय आहेत आजाराची लक्षणे?

हात पाय थरथरणे, शारीरिक हालचाल मंदावणे, चेहऱ्यावरील हावभाव बदलणे, अवयवांमध्ये शिथिलता, बोलण्यात कठीणता अशा विविध कारणांमुळे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे अवघड होते.

Disability
Pune Night Construction: कोरेगाव पार्क ॲनेक्समध्ये रात्रीच्या बांधकामामुळे नागरिक त्रस्त

पार्किन्सनग््रास्त दिव्यांगांसाठी आवश्यकतेनुसार औषधोपचार, सहाय्यक साधनांची उपलब्धता, शस्त्रक्रिया, भौतिकोपचार मोफतपणे मिळण्यासाठी स्वतंत्र योजना आखली पाहिजे. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार समाविष्ट सर्व प्रवर्गातील दिव्यांगांचे समांतर सक्षमीकरण आवश्यक आहे.

हरिदास शिंदे, दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news