Pune Metro Swargate Katraj Underground Corridor: पुणे मेट्रोचा स्वारगेट–कात्रज भूमिगत मार्गाचे काम सुरू

पाच स्थानकांचा समावेश असलेला हा मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोने दिली आहे
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या मेट्रो प्रकल्पाने आता पुढच्या टप्प्यात पाऊल टाकले आहे. पुणेकरांची प्रतीक्षा संपवत स्वारगेट ते कात्रज या अत्यंत महत्त्वाच्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, डिसेंबर 2029 पर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pune Metro
Pune Police Extortion: पुण्यात पोलिसांचा खंडणी घोटाळा उघड; बडतर्फीची कारवाई निश्चित

टनेल बोअरिंग मशिनचा ‌‘ॲक्शन प्लॅन‌’

या भूमिगत मार्गाचे काम अत्यंत वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महामेट्रोने कंबर कसली आहे. हर्डीकर यांनी कामाच्या तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले की, बोगदा खोदकामासाठी आवश्यक असलेल्या शाफ्ट खोदण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गासाठी एकूण चार टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) तैनात केल्या जाणार आहेत. दोन मशिन्स कात्रजच्या दिशेने, तर दोन मशिन्स स्वारगेटच्या दिशेने खोदकाम करतील. या सर्व मशिन्स आपले काम पूर्ण केल्यावर पद्मावती परिसरात जमिनीतून वरती बाहेर काढल्या जातील, असेही हर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

Pune Metro
Pune Night Construction: कोरेगाव पार्क ॲनेक्समध्ये रात्रीच्या बांधकामामुळे नागरिक त्रस्त

पाच स्थानकांचा नवा आराखडा

पूर्वी स्वारगेट-कात्रज या भूमिगत मार्गाच्या आराखड्यात फक्त तीन स्थानके नियोजित होती. मात्र, प्रवाशांची गरज आणि वाढता विस्तार लक्षात घेता आता या मार्गावर दोन नवीन स्थानकांची भर टाकण्यात आली आहे. यामुळे आता स्वारगेट-कात्रजदरम्यान एकूण पाच स्थानके असतील. त्यामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Metro
Pune Heritage Memorial Project Delay: पुण्यात महात्मा फुले वाडा–सावित्रीबाई फुले स्मारक प्रकल्प रखडला

पिंपरी-चिंचवड ते भक्ती-शक्ती मार्ग 2027 पर्यंत

पिंपरी-चिंचवड ते भक्ती-शक्ती (निगडी) या मार्गाचे काम 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. यामुळे आता पिंपरी-चिंचवड भागातील आणि पुण्यातून भक्ती-शक्तीला जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन मार्गांमुळे पुण्याच्या उत्तरेकडील निगडीपासून ते दक्षिणेकडील कात्रजपर्यंतचा प्रवास मेट्रोमुळे गतीने आणि सुखकर होणार आहे.

Pune Metro
Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसचा उमेदवार माघारी; सपकाळांचा राजकीय हल्लाबोल

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्ग 2029 पर्यंत पूर्ण केला जाईल. तसेच पिंपरी-चिंचवड ते भक्ती-शक्ती मार्ग 2027 पर्यंत पूर्ण करून प्रवासी सेवा सुरू करण्यात येईल.

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news