Pune Bhaji Mandi Issue: वडगाव बुद्रुक भाजी मंडई ६ वर्षांपासून बंद; रस्त्यावर विक्रीने वाहतूक कोंडी

लाखो रुपये खर्च करूनही मंडई वापराविना; अनधिकृत विक्रेत्यांमुळे नागरिकांची गैरसोय
Vadgaon Budruk Market
Vadgaon Budruk MarketPudhari
Published on
Updated on

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील कालव्यालगत महापालिकेने बांधलेली भाजी मंडई गेल्या सहा वर्षांपासून वापराविना पडून आहे. ग्राहक येत नसल्याचे कारण सांगून या मंडईतील विक्रेते सध्या छत्रपती संभाजी महाराज चौक ते शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग स्कूल परिसरातील रस्ता आणि पदपथावर बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे ही मंडई ‘असून अडचण आणि नसून खोंळबा’ अशी ठरत आहे.

Vadgaon Budruk Market
Pune Single Screen Cinema: पुण्यात एकपडदा चित्रपटगृहांचा अस्त; ३५ पैकी २८ बंद, उद्योग संकटात

महापालिकेने २०१९ मध्ये कालव्यालगत भाजी विक्रेते आणि इतर व्यावसायिकांसाठी मंडई आणि पत्र्याचे गाळे उभारले आहेत. उद्घाटनानंतर विक्रेते आणि व्यावसायिकांनी मंडईत दुकाने थाटली होती. दरम्यान, सहा महिने ही भाजी मंडई सुरळीतपणे सुरू होती. परंतु, अनधिकृत भाजी विक्रेते परिसरातील रस्ते आणि पदपथांवर बसू लागल्यानंतर या मंडईकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे सहा महिन्यांनंतर मंडईतील विक्रेते देखील छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग स्कूल परिसरात रस्ता आणि पदपथांवर व्यवसाय करू लागले.

Vadgaon Budruk Market
Balgandharva Controversy: बालगंधर्व रंगमंदिरात दुहेरी बुकिंग घोळ; श्रद्धांजली सभेत गोंधळ

यामुळे गेल्या सहा वर्षांपासून ही मंडई वापराविना पडून आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या मंडईचा उपयोग होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. मंडईत ७० गाळे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४० गाळेधारकांना महापालिकेने परवाने दिले असून, ते वर्षाला प्रत्येकी ३६ हजार रुपये भाडे महापालिकेला देत आहेत.

Vadgaon Budruk Market
Pune Blood Donation: पुण्यात रक्ताचा तुटवडा गंभीर; दररोज १५०० पिशव्यांची गरज, पुरवठा अपुरा

दरम्यान, भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने परिसरातील वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच, वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे परिसरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी तसेच भाजी मंडई पुन्हा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Vadgaon Budruk Market
Pune Cannabis Network: पुण्यात गांजाचा विळखा वाढतोय; १०७ किलो गांजा जप्त, युवक अटकेत

कालव्यालगत बांधलेल्या मंडईत बसण्याऐवजी भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनाने परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून परवनाधारक विक्रेत्यांना मंडईत बसण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

युवराज जाधव, रहिवासी, वडगाव बुद्रुक

वडगाव बुद्रुकमधील मुख्य चौकात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे सतत मोठी वाहतूक कोंडी होत होती. यामुळे कालव्यालगत भाजी मंइर्डची सोय करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही मंडईत वापराविना पडून आहे. ती पुन्हा सुरू होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

हरिदास चरवड, नगरसेवक

ही भाजी मंडई पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मंडईतील सर्व गाळे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील.

विजयकुमार वाघमोडे, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news