Daund Taluka Crime | बांधावरून वाद: उजवा हात मनगटापासून, डावा पाय नडगीपासून तोडला; सख्ख्या भावांचा चुलत भावावर जीवघेणा हल्ला

Pune Crime News |दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील घटना, यवत पोलिसांकडून दोघांना अटक
 Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

Pune Birobawadi brothers attack cousin

पाटस : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावांनी चुलत भाऊ कैलास हगारे याच्यावर जीवघेणा हल्ला करीत हात व पाय तोडल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी प्रवीण व नंदा हगारे या दोघा भावांना अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

जखमी कैलास हगारे यांची मुलगी अनुष्का हिने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पूर्वीपासून हगारे कुटुंबीयांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता. याच वादातून गुरुवारी सोमनाथ, प्रवीण, गणेश, नंदा, प्रतीक्षा व प्रांजल (सर्व रा. बिरोबावाडी, ता. दौंड) या सहा जणांनी मिळून कैलास यांच्यावर कोयता, तलवार, कुऱ्हाड यासारख्या धारदार हत्यारांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात कैलास यांचा उजवा हात मनगटापासून, तर डावा पाय नडगीपासून तोडण्यात आला.

 Crime News
पुणे : बारामतीत तरूणाचा निर्घृण खून

या गंभीरप्रकरणी संबंधित आरोपींवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रवीण आणि नंदा यांना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संपांगे करीत आहेत.

दरम्यान, यापूर्वी सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे आणि गणेश हगारे यांनी जखमी कैलास हगारे यांना मारहाण करून त्यांचा डावा पाय गंभीर जखमी केला होता. त्याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news