Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर फसवणूक; गॅस बंद होण्याच्या भीतीने 8.51 लाखांचा गंडा

कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; लिंकद्वारे बँक खाते हॅक
 Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: सायबर चोरट्यांनी गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविला होता. गॅसदेयक थकीत असून, पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली.

 Cyber Fraud
Pune Theft Arrest Case: पुण्यात बांगलादेशी चोराला अटक; 6.7 लाखांचे कॅमेरे जप्त

गॅसपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवावे लागतील, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. मोबाईल क्रमांक ‌‘हॅक‌’ केला. मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातील आठ लाख 51 हजार रुपयांची रोकड दुसऱ्या एका खात्यात जमा करून घेतली. खात्यातून पैसे काढण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे

 Cyber Fraud
Pune University Recruitment: पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापकांची भरती; दर्जा सुधारण्याचा प्रयत्न

पोलिस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

चार दिवसांपूर्वी शिवाजीनगर भागात मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या एका नागरिकाची सायबर चोरट्यांनी गॅसपुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली होती. गॅस, वीजपुरवठा खंडीत करण्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news