पुणे : पुढारी वृत्तसेवा : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षका वर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे, तसेच त्याची पत्नी काजल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेची उपनिरीक्षक शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदे याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला सातारा रस्त्यावर एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर शिंदेने संबंध तोडले. जाब विचारल्यानंतर शिंदेच्या पत्नीने जातीवाचक शिवीगाळ केली.
हेही वाचा