Pune Crime News : वारजेमध्ये अज्ञातांकडून तीन दुचाकींची होळी

Pune Crime News : वारजेमध्ये अज्ञातांकडून तीन दुचाकींची होळी
Published on
Updated on

पुणे/वारजे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीचा सण संपला नाही, तोच रामनगर परीसरात टवाळखोरांनी तोंड वर काढले असुन, वारजेतील रामनगर टाकी चौक परीसरात रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची धक्कादायक घटना रामनगर परीसरात घडली. आहे. वारजेतील रामनगर पाण्याची टाकी चौक येथे, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिन दुचाकी पेटविण्यात आल्या असुन एका चारचाकी वाहनाची काच फोडून वाहनांचे नुकसान केले आहे. दुचाकीला लागलेल्या आगीमुळे शेजारी उभ्या असलेल्या एका रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही घटना गुरूवारी (दि. 16 नोव्हेंबर ) रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली. हीरो होंडा या दुचाकीवरून गेलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांसध्ये वर्तविली जात आहे, तसेच हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत स्थानिक दुचाकी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून अधिक माहीती घेण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये एक चारचाकी, एक रिक्षा व तीन दुचाकींचा समावेश आहे. 2017 नंतर रामनगर परीसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु आज पुन्हा टवाळखोरांनी तोंड वर काढुन सामान्य नागरीकांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरीक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करुन, रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news