Pune Crime : कांदळीत कलाकेंद्रावर गोळीबार करणाऱ्या एकाला अटक

'मारू का?' अशी धमकी देत त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली
Pune Crime : कांदळीत कलाकेंद्रावर गोळीबार करणाऱ्या एकाला अटक
Published on
Updated on

नारायणगाव : कांदळी (ता. जुन्नर) येथील तुळजाभवानी संस्कृती कलाकेंद्रात कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार करणाऱ्या चौघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर मारुती हळदेकर (वय २८) असे त्याचे नाव आहे.

तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी केबल चोरी प्रकरणी जुन्नर, सुपा व इतर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

Pune Crime : कांदळीत कलाकेंद्रावर गोळीबार करणाऱ्या एकाला अटक
Pune Crime : उरुळी कांचनमध्ये सावकाराचा धक्कादायक कारनामा! लाखो रुपये वसूल करूनही पैशांसाठी तगादा; पोलीस ठाण्यातच महिलेला धमकी

पिस्तुलातून गोळीबार केल्याची ही घटना शनिवारी (दि. ८) पहाटे घडली होती. या गोळीबारात फिरोज कादीर शेख (वय ३१, रा. ओतूर, भोई गल्ली, ता. जुन्नर) हा जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीसह चौघांविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला गुन्हे अन्वेषण पथकाने पुणे येथे ताब्यात घेऊन नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जुन्नर न्यायालयात हळदेकर याला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातील या कला केंद्रावर पहिल्यांदाच गोळीबार झाल्याने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : कांदळीत कलाकेंद्रावर गोळीबार करणाऱ्या एकाला अटक
Viman Nagar Pub Raid: विमाननगरमध्ये पहाटे साडेतीनपर्यंत पब सुरू; गुन्हे शाखेचा छापा, २.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

तुळजा भवानी कला केंद्राचे व्यवस्थापक अक्षय अनिल धोंगडे (वय ३८, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कोळेकर, आण्णा, चिनु व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा केला आहे.

कांदळी येथील तुळजा भवानी कलाकेंद्रात कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून संबंधित आरोपींचा बारी मालकीण, फिर्यादी व तेथील कामगारांशी वाद झाला. तिसरी बारी न लावल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यावेळी वाद वाढल्यावर चौघांपैकी एका व्यक्तीने पिस्तूल काढून फिर्यादी अक्षय धोंगडे यांच्यावर रोखले. 'मारू का?' अशी धमकी देत त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली होती.

पहाटेपर्यंत केंद्र सुरू कसे?

दरम्यान, हे कला केंद्र पहाटेपर्यंत सुरू राहते कसे तसेच या कला केंद्रावर यापूर्वी देखील अनेकदा वाद झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नियमांचे उल्लंघन करून हे कला केंद्र सुरू असल्याने यावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news