Pune Rain Update | पुणे शहरात रविवारी पावसाने दाणादाण

Pune Rain Update | पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी चांगला पाऊस झाला.
Pune city is lashed with rain on Sunday
पुणे शहरात रविवारी पावसाने दाणादाणFile Photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे शहरात रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. शहरातील वडगाव शेरी भागात एका तासात १११ मिलिमीटर पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पावसाचा जोर एवढा होता, की शहरातील बहुतांश भागांतील घरांत, दुकानांत पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Pune city is lashed with rain on Sunday
सातारकरांच्या सेवेसाठी ई-बसेस दाखल

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी चांगला पाऊस झाला. मात्र, रविवारी जिल्ह्यातील पाऊस थांबला. शहरात सायंकाळी ५ ते ६ या एका तासात पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यांना पूर आला होता. वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, सांगवी या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली.

सायंकाळी ६.३० वाजता मात्र पाऊस थांबला. त्यामुळे दिवसभर सुरू असलेला उकाडा एकदम कमी झाला. गेल्या पाच दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. कमाल तापमान ३४ अंशांवर गेले होते. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी शहरात रात्री सातनंतर पावसाला सुरुवात झाली. उत्तर रात्रीपर्यंत शहराच्या सर्वच भागात जोरदार पाऊस झाला.

रविवारी दुपारपर्यंत कडक उन्हें पडले होते. उकाडा असह्य होत असतानाच आकाशात काळ्याभोर ढगांनी दाटी केली. अन् विजांच्या कडकडाटांसह सायंकाळी ५ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

विजांच्या कडकडाटांसह वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक भागांतील घरांत आणि दुकानांत पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. रस्त्यांना पूर आला. त्यामुळे त्यातून वाट काढताना बाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक भागांत झाडपडीच्या किरकोळ घटना घडल्या.

वडगाव शेरीत एका तासात १११ मिलिमीटर रविवारी झालेला पाऊस शहरात सर्वत्र सारखा नव्हता. कमी-जास्त वेगाने शहरात पाऊस झाला. सायंकाळी ५ ते ६ या एका तासात वडगाव शेरी भागात तब्बल १११ मिमी पावसाची नोंद झाली.

या भागातील अनेक दुकानांसह घरांत पाणी शिरले. रस्त्यावरून खूप वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे वाहने या पुरात अडकली. तसेच शहरातील मगरपट्टा, कोरेगाव पार्क, सांगवी, कात्रज रस्ता या भागांतही अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली.

Pune city is lashed with rain on Sunday
Pandharpur News : विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन दर्शन देणं भाोवलं

शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर

शनिवारी शहराचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांवर गेले होते. रविवारी यात वाढ होत हा पारा ३३ ते ३५ अंशांवर गेला. शिवाजीनगर ३४, तर मगरपट्टा, चिंचवड भागाचे तापमान ३५ अंशांवर गेले होते.

वडगाव शेरी भागात एका तासात १०१.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे ती ढगफुटीच आहे. प्रचंड उष्णतेमुळे हा पाऊस शहरात झाला आहे. याला हवामानाच्या भाषेत 'स्थानिक परिणाम' असे म्हणता येईल. प्रामुख्याने राज्यात आणि शहरात मान्सून कमकुवत झाल्याचे हे लक्षण आहे. जेव्हा मान्सून कमकुवत होतो तेव्हा अतिउष्णता वाढून असा पाऊस पडतो.

- डॉ. मेधा खोले, हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news