Jewellery Shop Theft: बंडगार्डन आणि कोंढव्यात सराफी पेढ्यांत चोरी; बुरखा घातलेल्या महिलांनी पाच लाखांचे दागिने लंपास

CCTV मध्ये महिलांची हालचाल कैद; दोन वेगवेगळ्या पेढ्यांत चोरी, दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल
Gold Jewelry Theft
Gold Jewelry TheftPudhari
Published on
Updated on

पुणे: खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी दागिने चोरून नेल्याची घटना बंडगार्डन रस्ता तसेच कोंढवा भागात घडल्या. याप्रकरणी कोरेगाव पार्क आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सराफी पेढीत चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा परिधान केल्याचे चित्रीकरणात आढळून आले.

Gold Jewelry Theft
IAS Appointment: राज्य मंडळावरील आयएएस नियुक्तीवरून वाद चिघळला; सहसंचालक कोर्टात

बंडगार्डन स्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाख रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आले. याबाबत सराफी पेढीतील रोखपालाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांनी बुरखा परिधान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Gold Jewelry Theft
Yedgaon Dam Machinery: येडगाव धरणाजवळ लाखोंची यंत्रसामग्री धुळखात; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्त्यावर एका प्रसिद्ध सराफी पेढीत १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. महिलांनी सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतविले. दागिने खरेदीचा बहाणा करून महिलांनी चार लाख ७४ हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले.

Gold Jewelry Theft
Rajgurunagar Municipal Election 2025: राजगुरुनगरला नगराध्यक्षपदासाठी 5 जण रिंगणात; नगरसेवकांच्या 18 जागांसाठी 58 उमेदवार

कडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नुकतीच पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सराफी पेढीतील चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करीत आहेत.

Gold Jewelry Theft
Jejuri Municipal Election 2025: जेजुरीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

कोंढवा भागातील एका सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ व्यावसायिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द भागात विठ्ठल मंदिराजवळ सराफी पेढी आहे. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन महिला खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरल्या. महिलांनी सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. पसार झालेल्या महिलांंनी बुरखा परिधान केल्याचे सराफ व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news