Pune Rain : पुण्यात पावसाने मोडले मे महिन्यातील १२ वर्षाचे विक्रम

Pune Heavy Rain : मे २०१५ मध्ये झाला होता ११२.७ मी.मी
Pune Heavy Rain
पुण्यात पावसाने मोडले मे महिन्यातील १२ वर्षाचे विक्रम File Photo
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यात यंदाच्या मे महिन्यातील गत १२ वर्षाच्या पावसाचे विक्रम मोडीत काढले आहेत.शहरात बुधवारी एकाच दिवसांत एनडीए भागात १११ मी.मी पावसाची नोंद झाली. शहरात मे महिन्यातील एकूण पाऊस हा १३२.३ मी.मी वर पोहोचला असून हा गत बारा वर्षातील मे महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे. यापूर्वी मे २०१५ मध्ये शहरात ११२.७ मी.मी पाऊस पडला होता.

मे महिन्याची सरासरी 11.4 मी.मीची आहे. मात्र हा पाऊस वळवाचा पाऊस म्हणून महिन्याच्या शेवटच्या आढवड्यातच पडलेला आजवर पाहिला आहे. मात्र, यंदाच्या मे महिन्यातील दृष्य खूप वेगळे अन अनेक विक्रम मोडणारे दिसत आहे. कारण, गेल्या तीन दिवसांपासून विक्रमी पाऊस शहरासह जिल्ह्यात बरसतो आहे. आगामी तीन दिवस शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने हा पाऊस गत ५० वर्षातील विक्रम मोडेल, असे चित्र दिसत आहे.

Pune Heavy Rain
Rain Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो पाऊस; अनेक ठिकाणी झाडे पडली

मे महिन्यात झालेला पाऊस (सन २०१३ ते २०२५) (मी.मी)

वर्ष - पाऊस

२०१३ - ०

२०१४ - ९.४

२०१५ - ११२.७

२०१६ - ६.५

२०१७ - ७.५

२०१८ - ३.७

२०१९ - ०

२०२० - ३४.८

२०२१ - ८८.८

२०२२ - ०.७

२०२३ - १९.४

२०२४ - ९.२

२०२५ - १३.३ (२२ मे अखेर)

Pune Heavy Rain
Unseasonal Rain Update: राज्यात अवकाळीचा जोर कायम; 22 मेपर्यंत पाऊस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news