BJP protest against Congress
पुणे: काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीतील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 13) अलका चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषा लडकत यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले.
आंदोलनकर्त्यांनी काँग्रेसवर तीव हल्लाबोल करीत ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी‘ या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या मूल्याचा काँग्रेसने अवमान केल्याचा आरोप केला. ‘काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे,‘ अशी टीका या वेळी करण्यात आली. (Latest Pune News)
या आंदोलनात स्मिता खेडकर, राजेश्री शिळीमकर, वृषाली चौधरी, अनिता शहाणे, लता धायगुडे, सुचेता भालेराव, सोनल कोद्रे, मोना गद्रे, अनिता तलाठी, सीमा लिमये, थोरविणा येणपुरे, गौरी शिरोळे, ज्योती गारवे, विद्या चव्हाण, रोहिणी रहाणे, सायली भोसले, अश्विनी दुबळे, कल्पना अय्यर, स्मिता गायकवाड, रेखा ससाणे, बाणेकर सारिका, वैजयंती पवळे, वृषाली शिंदे, प्रीती भाटीपाटील आदी पदाधिकारी आणि असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.
‘कोणत्याही व्यक्तीने मातृशक्तीचा अपमान केल्यास तो सहन केला जाणार नाही,‘ असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला तसेच मातृशक्तीच्या सन्मानासाठी जनतेनेही एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले.