

पुणे: कोथरूडमध्ये ऑपरेशन लोटसअंतर्गत शिवसेना उबाठा गटाला धक्का देत पृथ्वीराज सुतार यांचा भाजपप्रवेश केल्यावर भाजपने आता काँग््रेास आणि राष्ट्रवादीला धक्का दिला. वारजे भागातील राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी उपमहापौर दिलीप बराटे व वानवडी येथील काँग््रेासचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी शनिवारी (दि. 27) भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी, प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेतले जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. शनिवारी झालेल्या पक्षप्रवेश प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे आणि शहर भाजपचे निवडणूकप्रमुख गणेश बिडकर उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे वारजे आणि रामवाडी, वानवडी भागात भाजपची ताकद आणखी वाढली आहे. काँग््रेासचे हडपसर भागातील माजी मंत्री राज्यमंत्री व आमदार तसेच 40 वर्षांपासून काँग््रेास पक्षाशी एकनिष्ठ असलेले बाळासाहेब शिवरकर यांचे सुपुत्र अभिजित हे 2007 मध्ये वानवडी प्रभागातून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
त्यानंतर काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्यानंतर 14 वर्षांच्या अंतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत पुन्हा राजकीय प्रवास सुरू केला आहे. त्यांचे वडील काँग््रेासमध्ये असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. प्रभागांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाला राम राम करीत प्रशांत जगताप यांनी कॉंग््रेासमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अभिजित शिवरकर यांच्या रूपाने या प्रभागात भाजपला सक्षम उमेदवार मिळाला आहे, तर कॉंग््रेासला मात्र त्यांच्या भाजपप्रवेशामुळे खिंडार पडले आहे.
तर, राष्ट्रवादी काँग््रेासचे वारजे भागातील नेते व माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बराटे हे 40 वर्षांहून अधिक काळ पुण्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. मात्र, त्यांच्या पुतण्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्याला उमेदवारी मिळण्यासाठी नाही, तर पुतण्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी पतित पावन संघटनेत काम केल्याचा अनुभव सांगत त्यांनी सामाजिक कार्याशी आपली नाळ जोडलेली असल्याचे सांगितले.
वानवडी परिसरात भाजपची ताकद वाढणार
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलताना दिलीप बराटे यांचा प्रदीर्घ अनुभव भाजपसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. तसेच अभिजित शिवरकर यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता पक्षात दाखल झाल्याने वानवडी परिसरात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी बराटे आणि शिवरकर यांचे स्वागत करीत त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा पक्षाला फायदा होईल, अशी भावना व्यक्त केली.
भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीची चर्चा फिस्कटल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. आमच्या चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत जागा वाटपाबाबत योग्य निर्णय होईल. यासंदर्भातील घोषणा आम्ही लवकरच करू.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री व खासदार, पुणे