National Swimming Championship India: राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्विषा दीक्षितची दमदार कामगिरी; पाच पदकांची मानकरी
पुणे : ६९व्या राष्ट्रीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंनी यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्विषा दीक्षितने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदकासह पाच पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात त्विषाने 200 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण, 400 मी.मध्ये सुवर्ण, 4 बाय 100 मी. फ्री स्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावताना नवीन विक्रम केला. त्याचबरोबर 4 बाय 100 मिडले रिलेमध्ये रौप्य, तर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : झील मलानी (१७ वर्षांखालील मुली) ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक रौप्य - ३४.९२, १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक रौप्य - १:१७.१४, २०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक रौप्य - २:५२.३३. आयूष पुंडे (१७ वर्षांखालील मुले) ः ५० मी. बटरफ्लाय कांस्य - २६.२५. आयूष गायकवाड (१७ वर्षांखालील मुले) ः ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक कांस्य - ३०.८५ ४x१०० मी. मिडले रिले रौप्य. शाल्व मुळे (१७ वर्षांखालील मुले ) ः ४x१०० मी. फ्रीस्टाईल रिले रौप्य, ४x१०० मी. मिडले रिले रौप्य, २०० मी. बटरफ्लाय कांस्य - २:१२:१.

