Baramati Crime | बारामतीच्या तांदूळवाडीत माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू

घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाचा तर त्याची आई गळ्यावर काळसर व्रण असलेल्या अवस्थेत आढळून आली
  Crime News
Crime News : file photo
Published on
Updated on

Baramati Tandulwadi Mother Son Death

बारामती : बारामती शहरातील तांदूळवाडी भागातील दादा पाटीलनगर येथे विवेक विजय गावडे (वय १७, मूळ रा. कऱहावागज, ता. बारामती) याचा घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची आई रमा विजय गावडे (वय ४१) यांचा मृतदेह बाजूलाच गळ्यावर काळसर व्रण असलेल्या अवस्थेत आढळून आला. माय-लेकाच्या या संशयास्पद मृत्यूने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकऱणी विजय रामदास गावडे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. शुक्रवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता ही घटना उघडकीस आली. विजय गावडे हे बारामती एमआयडीसीतील जीटीएन कंपनीत नोकरीला आहेत. गुरुवारी (दि. २०) रोजी ते तांदूळवाडीतील दादा पाटील नगर येथून कंपनीत रात्रपाळीला कामाला गेले.

  Crime News
Baramati News : दिवंगत अजित पवारांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद; नगरसेवक मासाळ यांच्या राजीनाम्याची मागणी

शुक्रवारी सकाळी ते कामावरून परतले असताना घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी पत्नी रमा व मुलगा विजय यांना आवाज दिला. परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही. तसेच आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विजय यांनी शेजारी राहणाऱ्या सूरज भीमराव शिंदे यांना बोलावून घेतले. दोघांना दरवाजा उघडून पाहिले असता आतील खोलील विवेक याने घरात पत्र्याच्या अँगलला आकाशी रंगाच्या सुती दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

तर पत्नी रमा या खोलीतील भिंतीस लागून असलेल्या खिडकीजवळ पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिसल्या. विजय यांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे दिसून आले. तसेच रमा यांच्या गळ्यावर काळसर व्रण दिसून आले. शेजारी राहणारे त्यांचे मेहुणे हनुमंत वायसे हे घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले. विवेक व रमा यांना येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान या माय-लेकाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे. माय-लेकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

  Crime News
Baramati bus stand news | बारामती बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचे १ कोटी रुपयांचे बक्षीस

दोन दिवसांपूर्वीही एक संशयास्पद मृत्यूची घटना

बारामती शहरातील तांदूळवाडीजवळ शेळकेवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचीही चर्चा परिसरात होत आहे. परंतु पोलिस दप्तरी याबाबत कोणतीही नोंद नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news