Pune Bangladeshi Women Deportation: पुण्यातील ७ बांगलादेशी महिलांना सक्तमजुरी; न्यायालयाने मायदेशी परत पाठवण्याचे दिले आदेश

बुधवार पेठेतील कारवाईनंतर पारपत्र व परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध; 'दोन वर्षे दोन महिने' शिक्षा भोगून होणार बांगलादेशात रवानगी.
Pune Bangladeshi Women Deportation
Pune Bangladeshi Women DeportationPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरात बेकायदा वास्तव्य करून देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना न्यायालयाने दोन वर्षे दोन महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Pune Bangladeshi Women Deportation
Harshvardhan Sapkal: "सत्ताधाऱ्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार!" नगरपालिका निवडणुकीत 'पैसा फेक, तमाशा देख' वगनाट्य रंगले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची खरमरीत टीका

पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत दोषी ठरवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. पी. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. तसेच सरकारने त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी असेही निकालात नमूद केले आहे.

Pune Bangladeshi Women Deportation
Khadakwasla Encroachment Demolition: आलिशान रिसॉर्ट, बंगल्यांवर जलसंपदा विभागाचा 'हातोडा'

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने 9 ऑक्टोबर 2023 रोजी बुधवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली होती. आरोपी महिलांनी बांगलादेशी असल्याचे सांगून पारपत्र किंवा वैध कागदपत्रे नसताना सीमारेषेवरून चोरट्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. या आरोपी महिला चार वर्षांपासून पुण्यात देहविक्रीचा व्यवसाय करत होत्या.

Pune Bangladeshi Women Deportation
Ambegaon Onion Planting Machine: आंबेगावात मशीनद्वारे कांदा लागवड! मजूरटंचाईवर मात, शेतकऱ्यांची श्रम व वेळेची बचत

या सातही महिलांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर करण्यात आले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी बाजू मांडली. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 106 नुसार, आरोपींनी आपण भारतीय आहोत हे सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, ते सिद्ध करण्यात अपयश आले. देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या आरोपी महिलांना कठोर शिक्षा ठोठावून त्यांची बांगलादेशात रवानगी करावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी केला.

Pune Bangladeshi Women Deportation
Pune Nagar Panchayat Voting: थंडीचा अडथळा पार! पुणे जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदेसाठी मतदारांकडून लोकशाहीचा उत्स्फूर्त उत्सव

2 वर्षे कारागृहात शिक्षा भोगली

अधिकृत कागदपत्रांविना देशात प्रवेश करून वास्तव्य करणे गंभीर गुन्हा आहे. आरोपींनी गंभीर गुन्हा केला असून, त्यांना दयामाया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. आरोपी महिला गरिबीमुळे भारतात आल्या असून, त्या बांगलादेशच्या असल्याचे सिद्ध झाल्याने राज्याने त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे. अटक झाल्यापासून आरोपी महिला कोठडीत असल्याने हा कालावधी शिक्षेचा काळ धरून त्यांना बांगलादेशात पाठवावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news