पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (दि. 2) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या थंडीमुळे मतदारांची संख्या तुरळक होती. मात्र, दुपारनंतर बहुतांश केंद्रांवर लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः महिलांनीही मोठ्या संख्येने मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इंदापूर येथील श्रीमती कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा. दुसऱ्या छायाचित्रात बारामती तालुक्यातील एकमेव असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदानासाठी शिवनगर येथील शारदाबाई पवार कनिष्ठ विद्यालयातील मतदान केंद्रावर ओळखपत्र घेऊन रांगेत उभे असलेले मतदार. (छायाचित्रे : जावेद मुलाणी, इंदापूर. प्रा. अनिल धुमाळ, शिवनगर)