

पुणेः मित्रासोबत थांबलेल्या एका तरुणाचा दिवसाढवळ्या धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ दखनी मिसळच्या समोर घडली. मयंक खरारे (वय.१७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Pune News)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेला तरुण हा आंबीलओढा कॉलनी परिसरात राहण्यास असल्याची माहिती आहे. खरारे आणि त्याचा मित्र असे दोघेजण दुचाकीवरून निघाले होते.
त्यावेळी बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाजवळी दखनी मिसळच्या समोर आले असता, मास्क लावलेले तिघेजण पाठीमागून आले. त्यांनी दिसताक्षणी खरारे याच्यावर शस्त्राने वार केले. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थील रक्ताचा सडा पडला होता. तर आरोपींनी हत्यार जागेवरच सोडून पळ काढला.