

पुणे: शहरात येऊ घातलेल्या टू-व्हीलर टॅक्सीला तीव निषेध म्हणून ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने येत्या 9 ऑक्टोबर रोजी राज्यभर रिक्षा, टॅक्सी आणि कॅब एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली.
यासंदर्भात ऑटो, टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतीच बैठक आयोजित केली होती. या वेळी कृती समिती अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रीय फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे उपस्थित होते. (Latest Pune News)
... या आहेत मागण्या
बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येऊ नये
मुक्त रिक्षा परवाना बंद करावा आणि इलेक्ट्रिक रिक्षांना परवान्याच्या कक्षेत आणावे
कल्याणकारी मंडळावर रिक्षाचालकाची अध्यक्षपदी नेमणूक करावी.
प्रत्येक आरटीओमध्ये कल्याणकारी मंडळावर रिक्षाचालकांचे दोन प्रतिनिधी नियुक्त करावेत.
ओला-उबेरसारख्या भांडवलदार कंपन्यांकडून
रिक्षा-टॅक्सीचालक-मालकांचे होणारे आर्थिक शोषण थांबवावे.