

पुणे: आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाईदरम्यान जप्त केलेल्या वाहनांचा ऑनलाइन पद्धतीने 30 सप्टेंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावाकरिता जप्त केलेली 39 वाहने उपलब्ध असतील. त्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. (Latest Pune News)
जप्त वाहने पुणे आरटीओ कार्यालयाच्या आवारात, हडपसर बस डेपो, रांजणगाव पोलिस स्टेशन, शेवाळवाडी बस डेपो, येथे 20 ते 26 सप्टेंबर रोजी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहता येतील. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.