पुणे : गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कलाकाराचा मृत्यू

राजगुरुनगर परिसरातील घटना
Pune Garba event tragedy
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कलाकाराचा मृत्यू झाला.
Published on
Updated on

राजगुरुनगर : येथील एका नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात गरबा नृत्यकलेचे प्रदर्शन करताना नृत्यकलेत निपुण असलेल्या कलाकाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास घडली. अशोक माळी (रा. माळीमळा, राजगुरुनगर, मूळ गाव होळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे या कलाकाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Pune Garba event tragedy
नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णाचा प्रवाशांवर हल्ला, दोघांचा मृत्यू , ३ जखमी

माळी हे खानदेशी नृत्यकलेत निपुण होते. गरबाकिंग म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. नोकरी व्यवसायानिमित्त ते राजगुरुनगर येथे वास्तव्याला होते. एका लहान मुलासोबत ते रास दांडिया खेळायला आले होते. काही वेळानंतर ते जागेवरच कोसळले. आयोजकांनी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Pune Garba event tragedy
कोल्हापूर : पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news