Pune Airport Old Terminal: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलला लवकरच ‘ग्रीन सिग्नल’; बीसीएएसकडून पाहणी

सुरक्षा मंजुरीनंतर प्रवासी हाताळणी सुरू होणार; दोन्ही टर्मिनल अंतर्गत जोडले जाणार
Plane
PlanePudhari
Published on
Updated on

पुणे: 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी‌'च्या (बीसीएएस) पथकाने नुकतीच पुणे विमानतळावरील जुन्या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या तपासणीनंतर आता लवकरच या जुन्या टर्मिनलला उड्डाणासाठी ‌हिरवा कंदील‌ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Plane
Pune Robbery Accused Arrested: गोळीबार करून २२ तोळे सोने लुटणारे तिघे उज्जैनमध्ये जेरबंद

नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम प्रशासनाने वेगाने हाती घेतले होते. आता हे अद्ययावत काम पूर्ण झाल्यामुळे दोन्ही टर्मिनल्सच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. जुन्या टर्मिनलच्या पुनरुज्जीवनामुळे मुख्यत: पिक अवर आणि सणासुदीच्या, सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची कोंडी टळेल आणि प्रवाशांना तपासणीसाठी फायदा होणार आहे.

Plane
Shivajinagar Court Premises: शिवाजीनगर न्यायालय परिसराची दुरवस्था; वाढलेले गवत, तुंबलेले ड्रेनेज, चिखल अन् कचऱ्याचे साम्राज्य

दोन्ही टर्मिनल अंतर्गत एकमेकांना जोडणार

सुरक्षा यंत्रणेची अंतिम मान्यता मिळताच या टर्मिनलवरून प्रत्यक्ष प्रवासी हाताळणी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पुणे विमानतळावरील पायाभूत सुविधांना मोठी बळकटी मिळणार आहे. तसेच नवे आणि जुने असे दोन्ही टर्मिनल अंतर्गत एकमेकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही टर्मिनलमध्ये ये-जा करणे एकाच वेळी शक्य होणार आहे.

Plane
Sugar Price: साखरेचे दर ५२ रुपयांवर; शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपये द्यावेत, राजू शेट्टींची मागणी

बीसीएएसच्या पथकाने नुकतीच जुन्या टर्मिनलची पाहणी केली आहे. सुरक्षा पथकाकडून अंतिम मंजुरी मिळताच हे जुने टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत पूर्ण क्षमतेने दाखल केले जाईल. यामुळे पुणेकरांचा विमान प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.

संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news