

पुणे: हिवाळी हंगामातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि धुक्यामुळे निर्माण होणाऱ्या कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत कार्यान्वयन (ऑपरेशनल) सज्जता वाढवण्यासाठी पुणे विमानतळाने शनिवारी (दि.13) व्यापक धुके आणि कमी दृश्यमानता व्यवस्थापन मॉकड्रिल आणि टेबल टॉप चर्चेचे आयोजन केले होते.
या सरावाचा मुख्य उद्देश धुक्याच्या परिस्थितीमध्ये कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांचे समाधान सुनिश्चित करणे हा होता. विशेषतः उत्तर भारतातील विमानतळांवर धुक्यामुळे विमानांना होणारे विलंब, मार्गबदल आणि रद्दबातल यांसारख्या समस्यांवर त्वरित, समन्वित आणि एकसमान पद्धतीने तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या वेळी पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विमान कंपन्यांचे आणि विमानतळ प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी, सीआयएसएफचे जवान उपस्थित होते.या सरावाचा मुख्य उद्देश धुक्याच्या परिस्थितीमध्ये कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांचे समाधान सुनिश्चित करणे हा होता. विशेषतः उत्तर भारतातील विमानतळांवर धुक्यामुळे विमानांना होणारे विलंब, मार्गबदल आणि रद्दबातल यांसारख्या समस्यांवर त्वरित, समन्वित आणि एकसमान पद्धतीने तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या वेळी पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विमान कंपन्यांचे आणि विमानतळ प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी, सीआयएसएफचे जवान उपस्थित होते.