Pune Accident Compensation: अपघातात कर सल्लागाराचा मृत्यू; कुटुंबीयांना १.१८ कोटींची नुकसानभरपाई

पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाचा आदेश; पत्नी, आई आणि भावाच्या दाव्यावर विमा कंपनी व ट्रक मालकाला भरपाईचे निर्देश
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

पुणे: रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या ३२ वर्षीय कर सल्लागाराच्या कुटुंबीयांना १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. आर. पवार यांनी दिला आहे. मकरंद गोपाल जिंदे असे अपघातात मृत्यू झालेल्या कर सल्लागाराचे नाव आहे.

Accident
Pune Dry Fruits Price Hike: सुका मेवा महागला! बदाम-पिस्त्याची आवक निम्म्यावर; १५ दिवसांत दर १०० ते ३०० रुपयांनी वाढले

त्यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पत्नी, आई आणि भावाने नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. सिमेंट मिक्सर ट्रकचा मालक आणि विमा कंपनी यांच्याविरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.

Accident
Sugar Price Hike: सणासुदीत साखरेची आवक वाढविण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची तयारी

मकरंद हे २५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी दीडच्या सुमारास जांभूळवाडी येथून शिवाजीनगरकडे दुचाकीवरून जात होते. त्या वेळी भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मकरंद यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघाताच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मकरंद यांचा विवाह झाला होता.

Accident
UPI Digital Transactions In India: UPI ने रचला इतिहास; भारतात दरवर्षी २४० अब्ज डिजिटल व्यवहार

ते आठ वर्षांहून अधिक काळ कर सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. मकरंद यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख २१ हजार ७७४ रुपये होते. त्यांचे वय, उत्पन्न तसेच त्यांच्या उत्पन्नावर कुटुंबीयांचे असलेले अवलंबित्व विचारात घेऊन अर्जदारांच्या वतीने ॲड. प्रमोद धुळे यांनी १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.

Accident
Pune SIR Voter List: एसआयआरमध्ये ५५ लाख मतदारांच्या नोंदी संशयाच्या भोवऱ्यात; फॉर्म प्रलंबित, बीएलओंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

अर्जदार आणि विमा कंपनीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिकरणाने सर्व बाबींचा विचार करून मकरंद यांच्या कुटुंबीयांना १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news