Bribe Case: क्लार्क असल्याची बतावणी; लाच घेताना एकाला अटक

पुरंदरमधील वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात तहसीलदारांचा आदेश मिळवून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीला पुणे एसीबीने सासवडमध्ये पकडले.
Bribe News
Bribe NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात तहसीलदारांचा आदेश मिळवून देण्यासाठी क्लार्क असल्याची बतावणी करत एकाकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. सासवडमधील तहसीलदार कार्यालयासमोरील एका उपाहारगृहाच्या परिसरात बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलापार्जित जमीन पुरंदर तालुक्यात आहे.

Bribe News
Pune Dahi Handi 2026: थरांच्या विक्रमासाठी गोविंदांची कसून तयारी; सुरक्षेचा प्रश्नही कायम

या जमिनीच्या असमान हिस्साची सुनावणी सासवडमधील तहसीलदार कार्यालयात सुरू होती. २४ जून रोजी तहसीलदारांनी वादी आणि प्रतिवादी यांना समान संधी देऊन हे प्रकरण बंद केले. मात्र, याबाबत तहसीलदारांनी आदेश दिले नव्हते. त्यानंतर सासवडमधील तहसीलदार कार्यालयात २९ ऑगस्ट रोजी तक्रारदार गेले. तेव्हा खळदकर त्यांना भेटले.

हे प्रकरण तहसीलदारांसमोर ठेवण्यासाठी खळदकर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. २ सप्टेंबर) सासवडमधील तहसीलदार कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार तेथे गेले. त्यांनी खळदकर याची भेट घेतली.

तेव्हा या प्रकरणात तहसीलदारांचे आदेश मिळविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. खळदकर याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. सासवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी सायंकाळी भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यान्वये गु्न्हा दाखल करून खळदकर याला अटक करण्यात आली.

Bribe News
Pune Traffic Diversion: पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडी-जन्माष्टमीसाठी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, हवालदार बाळासाहेब गदादे, दीपक काकडे, रवी दिवेकर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news