पुणे : क्षेत्रीय कार्यालयांच्या मिळकतींची माहिती द्या : मालमत्ता व व्यवस्थापन विभाग

पुणे : क्षेत्रीय कार्यालयांच्या मिळकतींची माहिती द्या :  मालमत्ता व व्यवस्थापन विभाग

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने बांधलेल्या मिळकतींची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागाकडील मिळकतीची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाने मागविली आहे. संपादित जागा व अ‍ॅमिनेटीज स्पेस आणि विकासकाकडून मिळालेल्या सदनिका अशा मिळकतींवर महापालिकेची मालकी असते. त्या मिळकतींचे रस्ताबाधित नागरिकांचे पुनर्वसन व मिळकत वाटप नियमावली 2008 नुसार भाडेतत्त्वावर वाटप केले जाते. तसेच काही मिळकती झोपडपट्टी निर्मूलन, चाळ विभाग, भवन रचना, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालय यांना त्यांच्या मागणीनुसार व कामकाजाच्या सोयीनुसार हस्तांतरित केल्या जातात.

महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयामार्फत संकलित करण्यात येते. यात क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतीची माहिती संकलित असणे आवश्यक आहे. मात्र, क्षेत्रीय कार्यालये यांनी परस्पर बांधलेल्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे संकलित नाही. दरम्यान, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून आपल्या विभागाकडे हस्तांतरित केलेल्या सदनिका, गाळे, मोकळ्या जागा इत्यादींची अद्ययावत माहिती व क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेली मिळकतींची माहिती त्वरित पाठविण्यात यावी, असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी सर्व विभागांना दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news